Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: 13 वर्षांचा मुलगा IPL खेळणार ? जाणून घ्या कोण आहे वैभव सूर्यवंशी

IPL 2025: बिहारचा 13 वर्षांचा अंडर-19 क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने IPL लिलावात भाग घेऊन इतिहास रचला आहे. आयपीएल लिलावात नाव नोंदवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणाऱ्या IPL 2025 च्या बहुप्रतिक्षित मेगा लिलावात बोली लावल्या जाणाऱ्या 574 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत.

जेद्दाह येथे होणाऱ्या लिलावात आयपीएलच्या 10 पैकी कोणताही संघ त्याच्यावर बोली लावणार की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र या युवा डावखुऱ्या फलंदाजाने क्रिकेट विश्वाचे आणि जाणकारांचे लक्ष आधीच वेधून घेतले आहे .

vaibhav suryavanshi

कोण आहे वैभव सूर्यवंशी ?

वैभव सूर्यवंशी याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी बिहारमधील ताजपूर गावात झाला. वैभवने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वैभवच्या वडिलांचे नाव संजीव असून ते शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या मुलाची क्रिकेटची आवड ओळखून घराच्या मागे छोटे मैदान बांधून त्याला स्पोर्ट दिला. वैभव जेव्हा 9 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत दाखल केले.

आयपीएल लिलावात सूर्यवंशी हे महत्त्वाचे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. डावखुरा फलंदाज वैभव यादीत 491 व्या क्रमांकावर आहे. तो अनकॅप्ड फलंदाज श्रेणीचा (UBA9) भाग आहे. खेळाडूंच्या 68 व्या संचामध्ये त्याचे नाव आहे. जानेवारी 2024 मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केल्यापासून त्याने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

पहिल्या सामन्यातच शानदार शतक

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या भारत अंडर-19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 युवा कसोटी मालिकेदरम्यान सूर्यवंशीने प्रतिभावान खेळाडू म्हणून आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे. पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावून आपली अफाट क्षमता दाखवून दिली. वैभवची ही कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आणि मोठ्या सामन्यासाठी आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे.

वैभव सूर्यवंशी भारतीय संघाचा भाग

या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी सूर्यवंशी भारतीय संघाचाही एक भाग आहे. 30 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होलटेज सामन्यात भारत स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+