Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: IPL लिलावात सर्वात वयस्कर खेळाडू कोण ? या 3 जुन्या खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2025: IPL लिलावाची वेळ आता अगदी जवळ आली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या लिलावादरम्यान सर्व संघांचे मालक, प्रशिक्षक आणि इतर स्टार सदस्य उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्या खेळाडूंवर लक्ष करायचे आहे, याची तयारी सुरू आहे.

या आयपीएल लिलावात वैभव सूर्यवंशीचं नाव चर्चेत असणार आहे. तो बिहारचा असून तो १३ वर्षांचा आहे. महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू वयाच्या 42 व्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मात्र त्याला चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवले आहे. लिलावात काही वयोवृद्ध खेळाडूही दिसणार आहेत, ज्यांच्यासाठी बोली लावली जाणार आहे. आपल्याला माहिती पाहिजे असे हे तीन खेळाडू.

Mohammad Nabi

जेम्स अँडरसन: इंग्लंडकडून दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर अँडरसनने निवृत्ती घेतली आणि लगेचच फ्रँचायझी क्रिकेटकडे वळला आहे. 17 नोव्हेंबर नुसार त्यांचे वय 42 वर्षे 110 दिवस आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 700 हून अधिक विकेट्स आहेत. तर T20 मध्ये 41 विकेट आहेत. लिलावात कोणता संघ त्याच्यावर बोली लावतो हे पाहणे महत्वाचं आहे.

फाफ डु प्लेसिस: आरसीबीचा माजी कर्णधार यावेळी त्याला रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे तो लिलावाचा भाग बनला आहे. 17 नोव्हेंबर 2024 रोजी फॅफचे वय 40 वर्षे आणि 127 दिवस आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेक सामने खेळले आहेत. त्याच्या धावाही 4500 हून अधिक आहेत. यावेळी फाफ डू प्लेसिसला खरेदीदार मिळणार की नाही हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

मोहम्मद नबी : अफगाणिस्तानच्या या खेळाडूच्या खेळावर वयाचे कुठे ही परिणाम दिसत नाही. 39 वर्षे 206 दिवस वय असलेल्या मोहम्मद नबीचाही लिलाव झालेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या नबीला अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तो फक्त 7 सामने खेळला. त्यांचा योग्य वापर झाला नाही. षटकारांच्या बाबतीत नबी मोठ्या खेळाडूंच्या पुढे दिसतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+