Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is sachin yadav : नीरज चोप्राला मागे टाकणारा नवा भालाफेकपटू सचिन यादव कोण? पोलिस दलात करतो नोकरी

Who is sachin yadav : यंदाच्या जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राकडून मोठ्या आशा होत्या, पण त्याची फारशी चांगली कामगिरी राहीली नाही. या स्पर्धेचे विजेतेपद केशॉर्न वॉलकॉटने जिंकले. टोकियो येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम सारख्या दिग्गजांना मागे टाकत त्याने हे सुवर्णपदक जिंकले.

जागतिक स्पर्धेत नीरज चोप्राचा भाला जरी अपयशी ठरला असला तरी, भारताला एक नवा स्टार मिळाला आहे. या स्टार खेळाडूचे नाव आहे सचिन यादव, ज्याच्यासमोर नीरज चोप्राचा खेळ फिका पडला. सचिन यादवने ८६.२७ मीटर लांब भाला फेकून एक शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत तो चौथ्या क्रमांकावर राहिला.

Who is sachin yadav

नीरज चोप्राला मात्र ८४ मीटरहून थोड्याच अधिक अंतरावर समाधान मानावे लागले आणि तो आठव्या स्थानावर राहिला. पाकिस्तानचा अर्शद नदीमही ८३ मीटरच्या आतच राहिला आणि दहाव्या स्थानावर समाधान मानले. या स्पर्धेत दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते खेळाडू दबावाखाली खेळू शकले नाहीत आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर दिसून आला.

कोण आहे सचिन यादव? सविस्तर पाहूया..

जन्म आणि मूळ: सचिनचा जन्म २५ ऑक्टोबर १९९९ रोजी उत्तर प्रदेशमधील खेकरा येथे झाला.

सुरुवातीची आवड: सुरुवातीला त्याला वेगवान गोलंदाज बनण्याची इच्छा होती. पण, वयाच्या १९ व्या वर्षी त्याने भालाफेकीमध्ये करिअर करण्याचे ठरवले.

आदर्श: भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनी आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना तो आपला आदर्श मानतो.

नोकरी: सचिन यादव सध्या उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे.

घरच्या मैदानातही दमदार कामगिरी

सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी केली आहे. त्याने २०२५ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्यापूर्वी, याच वर्षी डेहराडून येथे झालेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले होते. त्या स्पर्धेत त्याने ८४.३९ मीटर भालाफेक करून एक नवीन मीट रेकॉर्डही बनवला होता, जो त्यावेळी त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड होता.

नीरज चोप्रा का अपयशी ठरला?

नीरज चोप्राला आपल्या कामगिरीची निराशा आहे, पण सचिनच्या यशाचा त्याला आनंदही आहे. भालाफेकीमध्ये भारताचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे त्याला वाटते. नीरजने सांगितले की, तो दुखापतीतून बरा होत होता आणि फक्त दोन आठवड्यांच्या सरावानंतरच तो या स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता.

हेही वाचा : Asia cup 2025 Ind Vs Pak : आशिया कपमध्ये 'या' दिवशी पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान! वाचा समीकरणं

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+