Asia cup 2025 Ind Vs Pak : आशिया कपमध्ये 'या' दिवशी पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान! वाचा समीकरणं
Asia cup 2025 Ind Vs Pak : भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक शत्रू आहेच पण क्रिकेटच्या दुनियेतही दोन्ही संघ एकमेकांना पाण्यात पाहतात, याचे कारणही तसेच आहे, भारत आणि पाकिस्तान संघातील सामने हे केवळ क्रिकेटचे सामनेच नाहीतर दोन्ही देशांतील जय-पराजयाचा संबंध आणि राष्ट्रीय अस्मिताही यातून ज्वलंतपणे दिसते.
काल १४ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. हा सामना भारतीय संघाने सात गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताच्या सहा धुरंधर खेळाडूंचे कौतूक करावे तितके कमी आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, अक्षर पटेल यांनी पाकची फलंदाजी अक्षरशः चिरली तर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी जोरदार फलंदाजी करत पाकविरुद्ध विजय मिळवला.

आशिया कपमधील खरी स्पर्धा पुढे आहे..
या विजयासह भारतीय संघ आता सुपर - ४ मध्ये पोहचला आहे. तर पाकिस्तानची शर्यत संपली असे समजता कामा नये. कारण पाकिस्तान आणि भारत यांच्यात पुन्हा लढत होण्याची शक्यता आहे, तीसुद्धा येत्या रविवारी... मात्र, तुम्हाला हे माहित नसेल तर आपण समजून घेऊया.
येत्या रविवारी पाक आणि भारत सामना होऊ शकतो
पाक संघ सुपर -४ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानच्या आशा अजूनही भक्कमपणे जिवंत आहे. कारण पाकसमोर आता युएईसारख्या दुबळ्या संघ आहे आणि हा सामना पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या संघासोबत पाकने जर विजय मिळवला तर तो सुद्धा भारतासोबत सुपर-४ मध्ये पोहचेल. त्यामुळे पाकिस्तान-भारत पुन्हा लढत होण्याची दाट शक्यता आहे.
पाक पोहचू शकतो सुपर ४ - मध्ये
सुपर -४ मध्ये प्रत्येक संघ इतर संघासोबत खेळत असल्याने पाक जर सुपर-४ मध्ये पोहचला तर भारताशी पुन्हा पाक संघाची गाठ पडणार आहे. या श्रेणीतील सामना २१ सप्टेंबरला आहे. म्हणजेच पुन्हा भारत पाक लढत रंगणार अशी चिन्हे आहेत.
पाकिस्तान अंतीम फेरीत पोहचू शकतो का..?
भारत सुपर -४ मधून अंतीम फेरीत पोहचू शकतो कारण भारतासारखा या स्पर्धेत तुल्यबळ संघ कोणताही नाही. दुसरीकडे भारतानंतर इतर संघांच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ तगडा आहे, जर सुपर -४ मध्ये दोन अव्वल स्थानी भारत आणि पाकिस्तान राहीले तर २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतीम सामन्यात या दोन्ही संघांची भिडत होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications