IPLमधून विराटबद्दल आली मोठी बातमी! किंग कोहलीचा 110 कोटींचा करार आला संपुष्टात, जाणून घ्या काय झालं?
Virat Kohli's Rs 110 crore deal with Puma India ends : विराट कोहली असा फलंदाज ज्याची जगभर सतत चर्चा होत असते, तो काही ना काही गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असतो. आताच त्याला बीसीसीआयने दिलेले गिफ्ट असो की, मंदिरात सपत्नीक देवदर्शन असो चर्चा मात्र त्याचीच होते. यावेळी त्याचा करार संपुष्टात आला असून आता त्याचीच चर्चा होत आहे.
विराट कोहलीने या आयपीएल सीजनमध्ये समिश्र कामगिरी केली आहे. फारच चांगली कामगिरी जरी त्याची झाली नसली तरीही त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली आहे. अशातच एक बातमी अचानक समोर आली जी विराट कोहलीचा 110 कोटींचा करार संपुष्टात आल्याची होती.

कुणासोबत होता विराट कोहलीचा करार
विराट कोहलीचा खेळाचे साहित्य तयार करणारी कंपनी पुमा इंडियासोबत 110 कोटींचा करार होता जो नुकताच संपुष्टात आला आहे. विराट कोहली पुमा इंडियाचा सदिच्छा राजदूत होता म्हणजेच ब्रँड अम्बेसेडर होता. आता ही डिल पुर्ण झाली आहे. त्यामुळे दोघे यातून मुक्त झाले आहेत.
गुंतवणूक केलेल्या कंपनीशी विराटचा करार
विराट कोहलीचा पुमा इंडियाशी करार संपल्यानंतर आता तो एजिलिटास कंपनीसोबत करार करत आहे. विराट या कंपनीत गुंतवणूकदारही आहे. पुर्वी पुमा इंडिया कंपनीशी संबंधित असलेले दक्षिण पुर्व व्यवस्थापकिय संचालक अभिषेक गांगूली आता एजिलिटास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर करतोय विराट राज
विराट कोहलीला आपल्या फलंदाजीच्या जोरावर असंख्य चाहते लाभले आहेत आणि कोणत्याही खेळाडूची लोकप्रियता आणि चाहते यावरुन कंपन्या खेळाडूंशी करार करतात. अशातच विराट कोहली हा जगातील सर्वात यशस्वी फलंदाजापैकी एक आहे भारतात तर त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. तो या चाहत्यांच्या हृदयावर राज करतो.
विराट कोहली कोणत्या कंपनीची करतो ब्रँडींग
विराट कोहली वन 8 कम्युन, नॉईज, सन फार्मा वोलिनी, एमआरएफ टायर्स, रेज कॉफी, फायर बोल्ट, उबेर इंडिया, विवो, बूस्ट, अमेरिकन टुरिस्टर यांसारख्या कंपन्यांशी संबंधित आहे. याआधी तो हिमालय, ब्लू स्टार, मिंत्रा, रोंग, मोबाइल प्रीमियर लीग, ऑडी इंडिया, मन्यावर, टिसो या कंपन्यांचे ब्रँड ॲम्बेसेडरही राहिला आहेत.
हेही वाचा : 15 वर्षांची साथ..! मुंबई बंगळुरू सामन्याआधी विराट कोहलीचा रोहीत शर्माबद्दल मोठा खुलासा! व्हिडिओ जारी
हेही वाचा : विराट कोहलीला BCCI ने T20 वर्ल्डकपचे दिले हे 'छोटे' बक्षीस! व्हिडिओ पहा, किंमत ऐकून बसेल धक्का!












Click it and Unblock the Notifications