सचिनचा 'विराट' विक्रम धोक्यात! कोहलीला मोडायला हवेत फक्त 'इतके' रन मास्टर-ब्लास्टरचा रेकाॅर्ड तुटणार
virat kohli VS sachin Tendulkar : भारतीय क्रिकेटचा किंग, दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या अविश्वसनीय फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु सिडनीतील तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद ७४ धावांची मॅचविनिंग खेळी करून कोहलीने आपली क्लास काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याचे प्रदर्शन आणखीनच दमदार राहिले.

दिर्घकाळ खेळण्याचा कोहलीचा निर्धार
रांचीमध्ये १३५ धावा आणि त्यानंतर रायपूरमध्ये १०२ धावा असे सलग दोन धडाकेबाज शतकं ठोकून कोहलीने क्रिकेट जगताला जोरदार संदेश दिला आहे. या दोन्ही खेळींमध्ये त्याच्या फलंदाजीतील स्ट्राइक रेटमध्ये झालेली सुधारणा स्पष्टपणे दिसून आली. कोहलीचा 'ट्रेडमार्क' अंदाज पुन्हा दिमाखात दिसल्याने, तो भारतीय संघासाठी अजून खूप काळ खेळणार हे निश्चित झाले आहे. या दमदार प्रदर्शनातून त्याने केवळ संघात आपले स्थानच पक्के केले नाही, तर निवडकर्त्यांनाही ठणकावून सांगितले की, २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी तो पूर्णपणे तयार आहे!
मास्टर-ब्लास्टरचा महाविक्रम किती दूर?
रायपूरमध्ये १०२ धावांची दमदार खेळी पूर्ण केल्यानंतर, विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील एकूण धावा १४,४९२ झाल्या आहेत. यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 'मास्टर-ब्लास्टर' सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) यांच्या विक्रमापासून आता फक्त ३,९३४ धावा मागे आहे. कोहलीचा सध्याचा फॉर्म आणि त्याची फिटनेस पाहता, हा विक्रम मोडणे आता केवळ वेळेची बाब असल्याचे क्रिकेट विश्लेषकांना वाटत आहे.
कोहली-गायकवाडचे शतक, तरीही भारताचा पराभव
दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकी खेळीनंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कोहली आणि गायकवाड यांच्या शानदार शतकांनी आणि के. एल. राहुलच्या ६६ धावांच्या उपयुक्त खेळीने भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता.
परंतु, हा विशाल स्कोअरही अखेरीस वाचवण्यासाठी पुरेसा ठरला नाही. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम याने ११० धावांची अप्रतिम खेळी करून आपल्या संघाला दमदार सुरुवात दिली. त्यानंतर मधल्या फळीतील मॅथ्यू ब्रेट्झके आणि डेवाल्ड ब्रेविस यांनीही अर्धशतकं झळकावली. अखेरीस, कॉर्बिन बॉशने शानदार खेळ दाखवत दक्षिण आफ्रिकेला ४ विकेट्सने थरारक विजय मिळवून दिला.
हेही वाचा : IND vs SA: गोलंदाजांची सुमार कामगिरी! 358 धावा करूनही टीम इंडियाचा पराभव; हे 4 खेळाडू ठरले कारणीभूत












Click it and Unblock the Notifications