कुणी म्हणाले जोकर, तर कुणी रडणारा... 'या'मुळे विराट कोहली आला ऑस्ट्रेलियन मीडियाच्या टार्गेटवर
भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या बाँर्डर-गावस्कर ट्राँफी सुरु आहे. सध्या चौथा कसोटी सामना सुरु असतानाच, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ऑस्ट्रेलियन मीडियाने टार्गेट केल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनेक वर्तमानपत्रात विराट कोहलीवर टिका करण्यात आली आहे.

कोहली मीडियाच्या टार्गेटवर
सध्या सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात नवख्या सॅम कोनस्टासने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली. या सामन्यात सॅम कोनस्टासला विराट कोहलीने धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या ११ व्या षटकात हा प्रकार घडला. त्यानंतर कोनस्टासन व कोहलीतील वाद थेट पंचापर्यंत गेला. आयसीसीनेही या वादाची दखल घेत कोहलीच्या मानधनातून २० टक्के रक्कम कपात केली. शिवाय त्याला डिमेरिटचा एक गुणही दिला. मात्र आयसीसीच्या या कारवाईवर ऑस्ट्रेलियन मिडिया नाराज झाली आणि त्यांनी कोहलीली टार्गेट केले.
The back page of tomorrow’s The West Australian. 🤡🤡🤡@westaustralian @TheWestSport pic.twitter.com/3BaiB3SOQi
— Jakeb Waddell (@JakebWaddell) December 26, 2024
काय म्हणतोय मीडिया
ऑस्ट्रेलियातील काही वर्तमानपत्रांनी कोहलीला चांगलेच धारेवर धरलेले दिसले. 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन' वर्तमानपत्राने कोहलीचा उल्लेख जोकर असा केला. या वर्तमानपत्राने Clown Kohli असं शीर्षक दिलं. त्याच वर्तमानपत्राने कोहलीला Sook म्हणजे रडणारा असं म्हंटलं. डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रानेही विराट कोहलीचा समाचार घेतला. सॅम कोनस्टासचे कौतुक करत या वृत्तपत्राने 'किंग कोन' असा मथळा दिला.
The Tele today capturing the Sam Konstas innings with the headline ’King Kon’ & lets not forget how Sam rattled the Indians especially the dummy spitter Virat Kohli. pic.twitter.com/u3o7F5aDXS
— OBBY (@OBBY001) December 26, 2024
पाँन्टींगनेही साधला निशाणा
माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग आयसीसीच्या निर्णयावर नाराज दिसला .दिलेली शिक्षा एकदम क्षुल्लक असल्याचं त्याने सांगितलं. विराट कोहलीला 2019 नंतर पहिल्यांदाच डिमेरिट गुण मिळाला आहे. दुसरीकडे, सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियन मीडियावर निशाणा साधला. 'ऑस्ट्रेलियन मिडिया 12वा खेळाडू म्हणून काम करते. ते कायम प्रतिस्पर्धी खेळाडूंना टार्गेट करतात. जे खेळाडू त्रासदायक ठरतात त्यांच्यावर खासकरून निशाणा साधतात. विराट कोहलीला कव्हर पेजवर ठेवून वर्तमानपत्रांची विक्री वाढते हे विसरून चालणार नाही. विराट कोहली कर्णधार नसतात त्याच्यासोबत पॅट कमिन्सचा फोटो छापला. हे सर्व खळबळजनक आहे.', असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications