Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

T-20त सर्वात फास्ट शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला उर्विल पटेल, त्याने कोणाचा मोडला विक्रम!

Urvil Patel T20 Fastest Century Record : गुजरात संघाचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक उर्विल पटेल हा टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध अवघ्या 28 चेंडूत शतक ठोकले. हा सामना इंदूरच्या स्टेडियमवर झाला.

विशेष बाब म्हणजे, उर्विलपूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, ज्याने 2018 मध्ये याच स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध 32 चेंडूत शतक झळकावले होते. उर्विलने 35 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या. यामध्ये 12 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला.

Urvil Patel

गुजरातने 8 गडी राखून जिंकला सामना

त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने अवघ्या 10.2 षटकांत 2 बाद 156 धावा करत विजय मिळवला. उर्विलने संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. त्याने सलामीवीर आर्यन देसाईसोबत पहिल्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली.

उर्विल जगातील दुसरा फलंदाज

T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा उर्विल जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इस्टोनियाच्या साहिल चौहानने सायप्रसविरुद्ध 27 चेंडूत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल-2013 च्या मोसमात पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून खेळताना त्याने 30 चेंडूत शतक झळकावले.

रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम!

रोहित शर्माच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.

मेगा लिलावात उर्विल अनसोल्ड राहिला

IPL-2025 च्या मेगा लिलावात उर्विल विकला गेला नाही. हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाला. उर्वीलवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. 2023 च्या मिनी लिलावात त्याला गुजरात टायटन्सने विकत घेतले होते. तरीही त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+