'त्या' व्यक्तीसोबतचा व्हिडिओ अन् वडिलांनी गोळ्या घातल्या, राधिकाच्या चारित्र्यावर काय म्हणाली आई?
Tennis player radhika yadav death case : राधिका यादव हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. राधिका कुणी साधीसुधी मुलगी नव्हती, ती राष्ट्रीय खेळाडू होती. टेनिसमध्येती भारताचे नावही उंचावत होती. देशासाठी तिने अनेक पारितोषिकं पटकावली होती. अशा स्थितीत तिच्याच वडिलांनी तिचा गोळ्या झाडून खून करणे ही धक्कादायक आणि खळबळ निर्माण करणारी गोष्ट आहे. राधिकाच्या मृत्यूला अनेक किनारे असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक व्हिडिओ आणि रिल्सबद्दलही चर्चा होत आहे.

आईचा वाढदिवस अन् घरात रक्ताचा सडा!
राधिका यादव हिचा खून अशा दिवशी झाला ज्या दिवशी तिच्याच आईचा म्हणजेच राधिकाचे वडील दीपक यादव यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. राधीका आईच्या वाढदिवशी जेवण बनवत होती. तेव्हाच तिच्यावर धाड्-धाड् गोळ्या चालवल्या गेल्या. गंभीर गोष्ट म्हणजे तिच्याच वडीलांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात वडिलांनी कबुलीही दिल्याचे मिडिया रिपोर्ट्स सांगतात.
पोलिसांना तपासात काय आढळले?
प्राथमिक तपासात पोलिसांना मिळालेली माहिती नातेसंबंधांच्या मर्यादा ओलांडणारी आहे. राधिका यादव नावाची ही राष्ट्रीय टेनिसपटू केवळ क्रीडा क्षेत्रातच आपला ठसा उमटवत नव्हती, तर आता ती स्वतःची टेनिस अकादमी देखील चालवत होती. पण वडील दीपक यादव यांना हे सर्व मान्य नव्हते. समाजाच्या टोमण्या आणि मानसिक दबाव यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे
या घटनेवर काय म्हणाली राधिकाची आई?
ज्यावेळी घटना घडली त्यावेळी राधिकासोबत घरात तिचे वडील दीपक यादव आणि आई मंजू यादव आणि लगतच काका कुलदीप यादव घरात उपस्थित होते. राधिकाचा भाऊ धीरज यादव त्यावेळी घरी नव्हता. राधिकाच्या आईने या प्रकरणात मौन बाळगले आहे. यावरून असे गृहीत धरले जात आहे की ती कदाचित तिच्या पतीला वाचवण्याचा ती प्रयत्न करत असावी? यातच पोलिसांनी राधिकाची आई मंजू यादव यांचे लेखी जबाब घेण्याचा प्रयत्न केला पण राधिकाच्या आईने सध्याच्या स्थितीत लेखी जबाब देण्यास नकार दिला आहे. तिने तोंडी सांगितले की तिला तिच्या पतीने राधिकाला का मारले हे माहित नाही.
राधिकाच्या चारित्र्यावर काय म्हणाली आई?
राधिकाच्या आईने तिच्या मुलीच्या चारित्र्याबद्दल उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर सांगितले की, तिचे चारित्र्य पूर्णपणे ठीक आहे. राधिकाच्या आईने सांगितले की तिला ताप आला होता आणि ती खोलीत झोपली होती. मिळालेल्या माहितीनुसार, राधिकाची हत्या झाली त्या दिवशी राधिकाच्या आईचा वाढदिवस होता. गोळी झाडली तेव्हा ती जेवण बनवत होती.
{video1}
म्युझिक व्हिडिओची चर्चा
वनइंडियाने दिलेल्यावृत्तानुसार, राधिका यादव एक वर्षापूर्वी (जानेवारी २०२४) रिलीज झालेल्या "कारवां" या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. हा व्हिडिओ LLF रेकॉर्ड्सने INAAM नावाच्या कलाकारासह रिलीज केला होता. राधिका त्यात मॉडेल म्हणून दिसली होती. राधिका काही रोमँटिक दृश्यांमध्येही दिसली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने या व्हिडिओवर आक्षेप घेतला होता आणि मुलीला तो सोशल मीडियावरून काढून टाकण्यास सांगितले होते.












Click it and Unblock the Notifications