ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित-विराटची एंट्री, पण या दिग्गज खेळाडूची सुट्टी! वाचा प्लेईंग-11
Team india playing xi In marathi : भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा रणनीतीचा भूकंप! १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वीच टीम इंडियात मोठा बदल झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान मिळवूनही, निवड समितीने रोहित शर्मा याच्याकडून वनडे संघाचे नेतृत्व धक्कादायकरीत्या काढून घेतले आहे.
आता युवा तडफदार सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे प्रथमच वनडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे! निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या या निर्णयावर टीका होत असली, तरी रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली दोघेही संघाचा भाग आहेत. 'हिटमॅन'ची एंट्री आणि यशस्वी जायस्वालला 'छुट्टी' अशा नाट्यमय घडामोडींनंतर, ऑस्ट्रेलियाला भिडण्यासाठी गिलच्या नेतृत्वाखालील भारताची 'ती' सर्वात खतरनाक प्लेइंग XI कोणती असेल, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे!

भारताची सर्वात 'धोकादायक' Playing XI कशी असेल?
सलामी जोडी: कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी रोहित शर्मा सलामीला असतील.
मध्य क्रम: तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असतील, तर उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या आणि यष्टिरक्षक केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील.
नितीश कुमार रेड्डी करणार पदार्पण?
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डी याला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची (Debut) संधी मिळण्याची शक्यता आहे.
स्पिनर आणि अष्टपैलू: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे अक्षर पटेल याला रवींद्र जडेजापेक्षा प्राधान्य मिळू शकते. मुख्य स्पिनर म्हणून कुलदीप यादव आपले स्थान कायम ठेवेल.
जलद गोलंदाज: वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल.
पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Probable Playing XI):
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
यशस्वी जैस्वालची सुट्टी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आघाडीचा फलंदाज यशस्वी जायस्वालला संधी मिळाली नाही, तर ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा हे अतिरिक्त पर्याय म्हणून संघात आहेत. यशस्वीच्या जागी रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : विराट, रोहीत, हार्दिक सोडा..! आशिया कपमध्ये 'या' खेळाडूची शंभर टक्के सरस कामगिरी!
हेही वाचा : स्मृती मानधना बनली ICC वनडेची जगातील नंबर वन फलंदाज, किती आहे तिची संपत्ती? वाचा 'या' खास गोष्टी












Click it and Unblock the Notifications