Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्मृती मानधना बनली ICC वनडेची जगातील नंबर वन फलंदाज, किती आहे तिची संपत्ती? वाचा 'या' खास गोष्टी

Smriti Mandhana Net Worth Biography Personal Life Career Records : भारतीय महिला क्रिकेट संघाची 'रन मशीन' स्मृती मानधना पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. तिच्या बॅटच्या जोरावर तिने ICC ODI क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. 16 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत, मानधनाने इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नॅट स्किवर-ब्रंटला मागे टाकत हे यश संपादन केले आहे.

Smriti Mandhana Net Worth

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने 63 चेंडूत 58 धावांची शानदार खेळी केली. जरी या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळाला नसला तरी, मानधनाने तिच्या या कामगिरीमुळे क्रमवारीत सात रेटिंग गुण मिळवले. आता तिचे एकूण 735 रेटिंग गुण झाले आहेत, जे स्किवर-ब्रंटच्या 731 गुणांपेक्षा चार जास्त आहेत.

स्मृती मानधनाची कमाई आणि विक्रम

स्मृती मानधना, भारतीय महिला क्रिकेटची आघाडीची फलंदाज, केवळ मैदानातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अव्वल आहे. तिच्या अनेक विक्रमांनी तिचे नाव जगभरातील महान खेळाडूंच्या यादीत सामील केले आहे.

शतकांची बरोबरी: आपल्या बॅटिंगच्या जोरावर मानधनाने लॉरा वोल्वार्ड, कॅरेन रोल्टन, स्टेफनी टेलर आणि सोफी डेव्हाईन यांसारख्या महान खेळाडूंच्या वनडे शतकांबरोबर बरोबरी साधली आहे.

सर्वाधिक धावा: वनडेमध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या १३६ आहे, जी तिच्या आक्रमक फलंदाजीची साक्ष देते.

अर्धशतके: शतकांव्यतिरिक्त, तिने २७ अर्धशतकेही झळकावली आहेत.

भारतीय महिला संघातील स्थान: भारतीय महिला संघातील सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती माजी कर्णधार मिताली राजच्या (७ शतके) नंतर आहे.

WPL ची सर्वात महागडी खेळाडू आणि कमाईचे स्त्रोत

स्मृती मानधना ही WPL (महिला प्रीमियर लीग) च्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे. RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) संघाने तिला ३ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानधनाची एकूण संपत्ती ३३ कोटी २९ लाख रुपये आहे. ती BCCI च्या 'A' ग्रेडमध्ये आहे, ज्यामुळे तिला वार्षिक ५० लाख रुपये पगार मिळतो.

मॅच फी आणि जाहिरातीतून कमाई

मॅच फी व्यतिरिक्त ती हिरो मोटोकॉर्प, बूस्ट आणि ह्युंदाई यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही प्रचंड कमाई करते, GQ इंडिया आणि फायनान्शियल एक्स्प्रेस सारख्या माध्यमांतूनही तिची कमाई होते.

बॉयफ्रेंडपेक्षा श्रीमंत?

स्मृतीचा बॉयफ्रेंड, गायक पलाश मुच्छाल, याची एकूण संपत्ती २० ते ४१ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे कमाईच्या बाबतीत ती त्याच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसते. स्मृती मानधनाचे हे यश तिच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे प्रतीक आहे, ज्यामुळे ती केवळ एक खेळाडू नाही, तर आजच्या युवा पिढीसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+