Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Asia Cup 2025 : विराट, रोहीत, हार्दिक सोडा..! आशिया कपमध्ये 'या' खेळाडूची शंभर टक्के सरस कामगिरी!

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टीम सज्ज झाली असून ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत जसप्रित बुमराह खेळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

आतापर्यंतच्या कारकिर्दीत जसप्रित बुमराह याने छाप सोडली असून अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. आज आपण आशिया कपमध्ये जसप्रित बुमराहची कामगिरी कशी आहे हे जाणून घेऊया.

Asia Cup 2025

कशी आहे जसप्रित बुमराहची आशिया कपमध्ये कामगिरी?

आशिया कप स्पर्धेत जसप्रित बुमराहने कारकि‍र्दीत आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. त्यापैकी १२ सामने त्याच्या उपस्थितीत भारताने जिंकले आहे. तर एका सामन्याचा निर्णय पावसामुळे लागू शकलेला नाही. म्हणजेच आशिया कपमध्ये बुमराह जेवढे सामने खेळला त्यात विजय प्राप्त झालेला आहे. या स्पर्धेत त्याच्या यश शंभरटक्के आहे.

कोण किती सामन्यात खेळले आणि भारताला किती विजय मिळाले?

  • जसप्रित बुमराहसारखाच आशिया कपस्पर्धेसाठी विचार केला असता, हार्दिक पांड्याने आतापर्यंत १३ सामने आशिया चषकात खेळले आहेत, त्याच्या उपस्थितीत ११ सामन्यात भारताला विजय मिळाला.
  • शिखर धवन आतापर्यंत आशिया कप स्पर्धेत १३ सामने खेळला त्यापैकी ११ सामने भारत जिंकला.
  • विराट कोहली आशिया कप स्पर्धेचे आजपर्यंत २५ सामने खेळला त्याच्या उपस्थितीत १९ सामने भारताने जिंकले आहेत.
  • रोहित शर्मा आजपर्यंत आशिया कप स्पर्धेत ३६ सामने खेळला त्यापैकी २७ वेळा त्याच्या उपस्थितीत भारताला विजयश्री मिळाली आहे.

आशिया कप स्पर्धेत जसप्रित बुमराहने घेतले १८ बळी

आशिया कप स्पर्धेत जसप्रित बुमराहचे यश चांगले आहे, त्याने १३ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत. जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीसाठी युएईची खेळपट्टी फायदेशीर असल्याचे मिडिया रिपोर्ट्स सांगतात, त्यामुळे बुमहार तिथे फलंदाजासाठी धोकादायक ठरु शकतो.

कोण ठरणार वरचढ बुमराह की शाहीन आफ्रीदी?

पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रीदीही आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. एकीकडे भारताचा जसप्रित बुमहार आणि पाकचा शाहीन यांच्यात आशिया कप स्पर्धेत टाॅप गोलंदाज होण्याची चुरस असेल दोघांचेही आशिया कपमधील कामगिरीबद्दल यावेळी चर्चा होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+