Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SA T20I: टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी एक विजयापासून दूर, सुर्यकुमार यादवला आज मोठी संधी

IND vs SA, 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना आज शुक्रवारी (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर वर्चस्व मिळवण्याकरिता फक्त एक विजय दूर आहे.

भारताने पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत विजयाची धमाकेदार सुरुवात केली. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या टी-20 मध्ये शानदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी केली. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने शेवटच्या षटकात विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

Team India vs South Africa

भारतीय संघ सातव्यांदा दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका खेळत आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत या सीझनमध्ये एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडिया मालिका जिंकून इतिहास रचू शकते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेत एखादा संघ 3 सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ असेल. याआधी कोणत्याही संघाने दोनपेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत.

खेळपट्टीचा अंदाज

जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियमची खेळपट्टी सामान्यत फलंदाजांसाठी अनुकूल आहे. पहिल्या डावातील सरासरी स्कोअर 151 अधिक आहे. मात्र दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला कायम फायदा झाला आहे. पाऊस पडला तर ओलाव्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्टेडियमची बॉंड्री फार मोठी नाही. बॉंड्री 65-70 मीटर आहे.

हवामान रिपोर्ट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या T20 सामन्याच्या दिवशी जोहान्सबर्गमधील हवामान सर्वसाधारण असेल. हवामान वेबसाइट Accuweather नुसार सामन्याच्या दिवशी पावसाचा कोणताही अंदाज नाही. दिवसाचे कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान 14 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान, जितेश शर्मा, विजयकुमार विशाख, रमणदीप सिंग , यश दयाल.

आफ्रिकेचा संघ: रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अँडिले सिमेलेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर, पॅट्रिक क्रुगर, मिराव्हान फेरेना, पॅट्रिक क्रुगर , ओटनीएल बार्टमन.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+