T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमध्ये कालचा भारत विरुद्ध अमेरिकेसोबतचा मॅच कुणी जिंकला? वाचा
T20 World Cup 2026 : यजमान आणि गतविजेत्या भारतीय संघाने टी२० विश्वचषक २०२६ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात संयुक्त राज्य अमेरिका (USA) संघाचा २९ धावांनी पराभव करत स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली आहे. शनिवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव याची आक्रमक फलंदाजी आणि भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

सूर्याचे 'होम ग्राउंड'वर वादळ; सुरुवातीला पडझड नंतर डा सावरला
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे हे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाल्याने अवघ्या काही धावांतच भारताचे ४ महत्त्वाचे गडी तंबूत परतले होते. मात्र, आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने मैदानाचा ताबा घेतला. त्याने आपल्या सिग्नेचर शॉट्सचा नजराणा पेश करत ८४ धावांची नाबाद खेळी साकारली. सूर्याच्या या खेळीमुळे भारताने २० षटकांत १६१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अमेरिकेच्या शाडली वैन शल्कविकने भेदक गोलंदाजी करत भारताच्या आघाडीच्या फळीला अडचणीत आणले होते.
सिराज आणि अर्शदीपचा भेदक मारा; अमेरिकेची झुंज अपयशी
१६२ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना अमेरिकेच्या फलंदाजांना भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जखडून ठेवले.
मोहम्मद सिराजने आपल्या अचूक लाइन-लेंथने २ महत्त्वाचे बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच धक्का देऊन अमेरिकेला बॅकफुटवर ढकलले.
मधल्या षटकांत अक्षर पटेलने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेत अमेरिकेच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या.
अमेरिकेकडून मिलिंद कुमारने सर्वाधिक ३४ धावांची झुंज दिली, मात्र त्यांचा संघ २० षटकांत ८ बाद १३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला.












Click it and Unblock the Notifications