Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SRH vs LSG : शार्दूल ठाकूर ठरला बाजीगर! IPL लिलावात अनसोल्ड तरीही हैदराबादविरुद्ध टीपले 4 बळी!

SRH vs LSG Shardul Thakur : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या टॉप ऑर्डरची कामगिरी आज काही खास नव्हती. ज्या प्रकारे इशान किशनने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. तसे काही दिसले नाही. तरीगही ट्रॅव्हिस हेडची बॅट तळपत होती, या सामन्यातही त्याने धावांचा पाऊस पाडला.

ट्रॅव्हिस हेडने 28 चेंडूंचा सामना करत 47 धावांची खेळी केली. लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून पेट कमिन्सच्या हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले.

SRH vs LSG Shardul Thakur

शार्दुल ठाकूरने हैदराबादला चांगली सुरुवात करण्यापासून रोखले आणि सलग दोन बळी घेतले. त्याने प्रथम अभिषेक शर्माला वैयक्तिक 6 धावांवर बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने इशान किशनला आपला बळी बनवले. किशनने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते.

क्रीजवर आल्यानंतर हेनरिक क्लासेनने आक्रमक खेळ दाखवला, मात्र तो 26 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला. त्याच्यानंतर नितीश रेड्डीने जबाबदारी स्वीकारली आणि काही धावा केल्या. रेड्डीने 28 चेंडूंचा सामना करत 22 धावा केल्या आणि तो रवी बिश्नोईच्या चेंडूवर आला. त्याच्यानंतर अनिकेत वर्माने आक्रमक पवित्रा घेतला पण तो 13 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.

आयपीएलमध्ये अनसोल्ड राहीला शार्दूल!

शार्दुल ठाकूरने इशान किशनला गोल्डन डकवर बाद करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. हा तोच शार्दुल आहे, ज्याला आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. नंतर मोहसीन खानच्या जागी शार्दुल ठाकूरला आणण्यात आले. इशान किशनला बाद करण्यापूर्वी शार्दुल ठाकूरने धडाकेबाज खेळाडू अभिषेक शर्माला माघारी पाठवले आणि सलग दोन विकेट घेत पॉवरप्लेमध्ये खळबळ उडवून दिली.

शार्दूलने हेडला केले बाद, घेतले 4 बळी

ट्रॅव्हिस हेडने आपला आक्रमक पवित्रा दाखवला मात्र तो 28 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने शेवटच्या षटकांमध्ये आणखी दोन बळी घेतले. त्याने 4 षटकात 34 धावा देत 4 बळी घेत हैदराबाद संघाला 9 गडी बाद 190 धावांपर्यंत रोखले. गेल्या सामन्याप्रमाणे यावेळीही फलंदाजांना धडाका लावता आला नाही. या सामन्यात शार्दूलने कसून गोलंदाजी करत चार बळी टिपले आणि लखनऊच्या विजयात आपली मोलाची भर घातली.

हेही वाचा : Kavya Maran : 26 चेंडूत 70 रन!, निकोलस पूरनपुढे हैदराबाद पराभूत; काव्या मारनवर बनल्या मजेदार मीम्स!

हेही वाचा : Avesh khan : SRHसाठी कर्दनकाळ ठरेल आवेश खान; वाचा त्याची IPL कारकिर्द, LSGने काय घेतला निर्णय?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+