Kavya Maran : 26 चेंडूत 70 रन!, निकोलस पूरनपुढे हैदराबाद पराभूत; काव्या मारनवर बनल्या मजेदार मीम्स!
Ipl SRH vs LSG : काल 27 मार्च 2025 रोजी झालेला आयपीएलचा सामना रोमांचक झाला, लखनऊने हैदराबादवर विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली. या सामन्यात लखनऊचा तडाखेबंद खेळाडू निकोलस पूरनने जोरदार फलंदाजी केली आणि लखनऊ सुपर जायंट्सला एकहाती विजय मिळवून दिला.
निकोलसने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जोरदार फलंदाजी केली आणि मैदानावर चौकार आणि षटकार ठोकले. अवघ्या 26 चेंडूत 70 धावा त्याने केल्या. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 9 गडी गमावून 190 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. यानंतर प्रत्युत्तराचा डाव खेळताना लखनऊने मार्करामची विकेट लवकर गमावली. तो अवघ्या 1 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर आऊट झाला आणि निघून गेला.

या स्थितीत हैदराबाद गोलंदाजीवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल असे वाटत होते पण त्याआधीच निकोलस पूरनने धावांचा पाऊस पाडला. निकोलस पुरनने हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. तुफानी शैलीत फलंदाजी करत त्याने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याची फलंदाजी पाहून हैदराबादची शिक्षिका काव्या मारनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. ती खूप चिंतेत दिसत होती आणि सोशल मीडियावर मीम्सही तयार झाले होते.
Kavya Maran !!
— Avneesh Mishra (@RajaMishra007) March 27, 2025
कोई हसीना जब रूठ जाती है,
तो और भी हसीन हो जाती है!!#SRHvLSG pic.twitter.com/4s8h8rXRHe
निकोलस पूरनने 26 चेंडूत 70 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 6 शानदार षटकार ठोकले. आजच्या सामन्यादरम्यान काव्या मारन अनेकवेळा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसली. प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळीही त्यांच्या प्रतिक्रियेबाबत सोशल मीडियावर मीम्स बनवण्यात आले. निकोलस पुरनने वन मॅन आर्मीप्रमाणे काम केले आणि लखनऊने हा सामना 5 विकेटने जिंकला.
kavya maran ko jitne do yrr kitni cute lag ri😍 pic.twitter.com/VuVnuCT9N1
— Abhishek🥀 (@abhi_yaarrr) March 27, 2025
मिम्स जिच्यावर बनल्या ती कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन एक भारतीय उद्योगपती, सह-मालक आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सनरायझर्स हैदराबादच्या आणि SA-20 लीगमधील सनरायझर्स इस्टर्न केप आणि सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडच्या कार्यकारी संचालक आहेत. सन ग्रुपच्या चेअरमन आणि संस्थापक कलानिती मारन यांच्या त्या कन्या आहेत.
Kavya Maran after watching his team playing with the run rate of 10 runs per over. #SRHvLSG #OrangeArmy #SRHvLSG pic.twitter.com/0g4UAPdBWq
— Payal (@Oyepayal) March 27, 2025
काव्या मारन हिचे वडील कलानिथी मारन हे आहेत, त्यांनी स्थापन केलेले समूह म्हणजे सन ग्रुप जो आशियातील सर्वात मोठ्या मीडिया नेटवर्कपैकी एक आहे. काव्या ज्यावेळी ग्रुपमध्ये सामिल झाली त्यावेळी तिने सन ग्रुप अंतर्गत इतर एफएम चॅनेल व्यतिरिक्त सन टीव्ही नेटवर्क आणि सन म्युझिकच्या ऑपरेशन्सची देखरेख करून सुरुवात केली.
#SRHvLSG
— Rohit Gudala (@ROHITGUDALA33) March 27, 2025
Advertisement on time on point ♥️✨️
Cutie Kavya maran #LSGvsSRH #IPL2025 pic.twitter.com/gOz7IYjIor
जानेवारी 2024 मध्ये, काव्या मारन हिला देवी अवॉर्ड्स मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या मागे असलेला चेहरा आणि शक्ती म्हणून सन्मानित करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications