Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्मृती मंधना कोट्यवधीची मालकिण! WPL मधील सर्वात महागडी खेळाडू, किती आहे तिची संपत्ती जाणून घ्या

Smriti mandhana Net worth : भारताची स्टार क्रिकेटपटू आणि महाराष्ट्र कन्या स्मृती मंधाना ही कोल्हापूरची. तिथल्या रांगड्या मातीतली ही क्रिकेटपटू आज देशाची शान झाली आहे. जागतिक महिला क्रिकेटमध्ये तिचा डंका वाजत आहे. ती भारतीय महिला संघाचा कणा आहे. अलिकडे तिच्या कमाईची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही महत्वाचे आहे.. ते म्हणजे ती आता भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रितनंतर सर्वात जास्त श्रीमंत क्रिकेट खेळाडू ठरली आहे.

Smriti mandhana net worth

स्मृती श्रीनिवास मानधना हिचा जन्म 18 जुलै 995 रोजी झाला. ती भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. स्मृती मानधना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डब्ल्यूपीएल स्पर्धेत ती रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरू या संघाकडून खेळते. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती महाराष्ट्राकडून खेळते. देशासाठी तिने अनेक महत्वाच्या क्रिकेट सामन्यात एकहाती विजय खेचून आणला आहे.

किती आहे स्मृती मानधनाची संपत्ती (Smriti mandhana Net worth)

स्मृती मानधना हिची अंदाजे 30 कोटींहून अधिक निव्वळ संपत्ती आहे, ती तिच्या केंद्रीय BCCI करार, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सतत विस्तारत असलेल्या महिला प्रीमियर लीग WPL मधून येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्मृती मानधनाची एकूण संपत्ती 33 कोटी 29 लाख रुपये आहे.

डब्ल्यूपीएलची सर्वात महागडी खेळाडू

महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) महिला संघाची कर्णधार आहे. ती WPL ची सर्वात महागडी खेळाडू देखील आहे. RCB ने तिला 3.4 कोटी रुपयांना खरेदी केले, जे या लीगमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जातो.

स्मृती मानधना कमावते कोट्यवधी रुपये

बीसीसीआयच्या करारात स्मृती मानधना A ग्रेड खाली येते. ज्यामुळे तिला 50 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. यासह ती मॅच फी आणि हिरो मोटोकॉर्प, बूस्ट आणि ह्युंदाई यासह विविध ब्रँडसह जाहिरातींमधून मोठी कमाई करते. तसेच जीक्यू इंडिया आणि फायनान्शिअल एक्स्प्रेस सारख्या स्त्रोतांकडूनही ती कमाई करते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+