शुभमन गिल-सारा तेंडुलकर इंग्लंडमध्ये दिसले एकत्र! फोटो लीक अन् अफेअरच्या चर्चांना पुन्हा आले उधाण!
Shubman Gill-Sara Tendulkar Photo : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने त्यांच्या YouWeCan फाउंडेशनसाठी 8 जुलै 2025 रोजी लंडनमध्ये, एका चॅरिटी डिनरचे आयोजन केले होते, ज्यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक बडे खेळाडू या ठिकाणी आले होते. कर्करोग जागरूकता आणि उपचारांसाठी निधी उभारण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमातील एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात पुन्हा चर्चांना उधाण आले.
शुभमन-साराच्या प्रेमाच्या रंगल्या चर्चा!
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल संपूर्ण टीमसह या डिनरमध्ये पोहोचला होता. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याचे कारण, म्हणजे, या फोटोमध्ये, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर त्याच्यासोबत दिसली, या व्हायरल फोटोमुळे पुन्हा एकदा शुभमन आणि साराच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आले.

गिल-सारा इंग्लंडमध्ये एकत्र दिसले!
युवराज सिंगचे YouWeCan फाउंडेशन, ज्याची स्थापना त्याने 2011 मध्ये कर्करोगाशी लढाई जिंकल्यानंतर केली होती, ती कर्करोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, लवकर निदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी काम करते. लंडनमधील या चॅरिटी डिनरचा उद्देश फाउंडेशनसाठी निधी उभारणे हा होता. याच कार्यक्रमातील एक फोटो समोर आला. ज्यामध्ये शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकत्र दिसत आहेत.
साराकडे पाहून शुभमन गिल हसला!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये भारतीय कर्णधार शुभमन गिल हा सारा तेंडुलकर कडे पाहून हसताना दिसत आहे. सारा ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी आहे.
हा फोटो गिल संघासोबत या कार्यक्रमाला जेवणासाठी आला तेव्हाचा असल्याचे सांगितले जात आहे. तर सारा आधीच त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. सारा तेंडुलकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कार्यक्रमाचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रीणींसोबत फोटो काढताना दिसत आहे.
अफेअर संदर्भात आधीच होतेय चर्चा!
शुभमन गिलचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी अनेक वेळा जोडले गेले आहे. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या अफवा चर्चेत होत्या. दोघेही पूर्वी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत असत.
ते एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट देखील करतात. तथापि, शुभमन आणि सारा यांनी या अफवांवर कधीही उघडपणे काहीही सांगितले नाही. परंतु, सातत्याने त्यांच्या अफेअरची चर्चा होत असतेच. त्यात आता नुकत्याच लंडनमधील कार्यक्रमातील एकत्रीकरणाने त्याला अधीच चर्चांचे स्वरुप प्राप्त झाले.












Click it and Unblock the Notifications