Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"मला शुभमन गिलला डेट करायचेय!" कोण आहे 'ही' सिनेतारका जिने केली अशी इच्छा व्यक्त! व्हिडिओ व्हायरल..!

shubman gill And pragya jaiswal :टीम इंडियाचे स्टार खेळाडू शुभमन गिलची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, तो मुलींच्या हृदयात असतो आणि त्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे. बऱ्याच काळापासून, त्याचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले आहे, परंतु गिल किंवा त्या सुंदरींनी यावर उघडपणे काहीही सांगितले नाही. पण यावेळी जे घडले ते खूपच वेगळे आणि आश्चर्यकारक होते.

प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालने एका चॅट शो दरम्यान उघडपणे सांगितले की, 'ती शुभमन गिलला डेट करू इच्छिते कारण तिला तो खूप गोंडस वाटतो.' 'ती सध्या अविवाहित आहे, तिला कोणत्याही क्रिकेटरला डेट करण्यात काहीच अडचण नाही आणि जर गिल असेल तर खूप छान आहे, नशिबात लिहिलं असेल तर नक्कीच होईल. लोक जर त्याला माझा जोडीदार बनवत असेल तर बनवा यार..असं म्हणत ती खळखळून हसली.

shubman gill
प्रज्ञा जयस्वालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रज्ञा जयस्वालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. गिलचे नाव यापूर्वी सारा अली खान, सारा तेंडुलकर आणि अनन्या पांडे यांसारख्या स्टार्ससोबत जोडले गेले आहे. जरी गिलने कधीही कोणत्याही नात्यावर आपलं मत व्यक्त केले नाही.

प्रज्ञा जैस्वाल मूळची मध्यप्रदेशची

प्रज्ञा जैस्वाल मूळची मध्यप्रदेशची असून तिने दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. 12 जानेवारी 1991 रोजी एमपी, जबलपूर येथे जन्मलेल्या प्रज्ञा जैस्वालने पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून शिक्षण घेतले, परंतु तिने तिचे करिअर म्हणून मॉडेलिंग निवडले, ती अनेक सौंदर्य स्पर्धांचा भाग राहिली आहे.

2014 मध्ये 'टिटू एमबीए' द्वारे प्रज्ञाचे बाॅलीवूडमध्ये पदार्पण

प्रज्ञा तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती, परंतु तिला 'कांचे' (2015) या चित्रपटातून यश मिळाले. सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण साउथचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'टीटू एमबीए'मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. नक्षत्रम् (2017), आचारी अमेरिका यात्रा (2018) आणि अखंड (2021) यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

आयपीएल 2025 मेगा लिलाव सोमवारी संपला आहे. या लिलावापूर्वी गुजरात संघाने केवळ 5 खेळाडूंना कायम ठेवले होते. ज्यामध्ये कॅप्टन शुभमन गिलचाही समावेश होता.

मेगा लिलाव संपला, गुजरातचा संघ पुढीलप्रमाणे..

शुभमन गिल, रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड , जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद अर्शद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्रा, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+