हार्दिक पंड्या अन् शुभमन गिल यांच्यात भांडण!, गिलच्या एका पोस्टने केला मोठा खुलासा, म्हणाला...
Shubman Gill posts Instagram : आयपीएल 2025 मध्ये एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे गुजरात संघ आयपीएलमधून बाहेर पडला.
सामन्यानंतर शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या एकमेकांना भेटून कौतुक करताना दिसले नाहीत. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांमधील भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने आता या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे.

शुभमन गिलने सोडले मौन
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासोबतच्या मतभेद अथवा भांडणाच्या बातम्यांवर मौन तोडत शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली आहे. खरंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता,
ज्यामध्ये दोन्ही खेळाडूंमधील कथित मतभेदांबद्दल चर्चा होत होती. हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी गिल आणि पंड्या यांच्यात तणाव आहे असे गृहीत धरले. पण आता गिलने या बातम्यांना केवळ अफवा म्हटले आहे.

हार्दिकसोबत शेअर केलेला फोटो
शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई संघाने २० धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलने पंड्यासोबतचा स्वतःचा फोटो शेअर केला. गिलने हार्दिकसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'प्रेमाशिवाय काहीही नाही. इंटरनेटवर काय चालले आहे यावर विश्वास ठेवू नका.' गिलने त्याच्या पोस्टमध्ये हार्दिकलाही टॅग केले.
नेमका काय झाला होता वाद, सोशल मीडियावर काय झाले व्हायरल?
या वादाच्या अफवांना एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वेग आला. जेव्हा एलिमिनेटर सामन्याचा टॉस होत होता, ज्यामध्ये एमआयने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी शुभमन गिल एमआयचा कर्णधार हार्दिकशी हस्तांदोलन न करता निघून गेला. शुभमन गिलच्या विकेटवर हार्दिक पूर्ण उत्साहाने आनंद साजरा करताना दिसला तेव्हा हे प्रकरण आणखी तापले. एलिमिनेटर सामन्यात गिल फक्त 1 धाव काढल्यानंतर बाद झाला.
Something going serious between #Hardikpandya𓃵 & #ShubmanGill egoistic clash happened Gill is a attitude and waste fellow not at all good this much attitude in this age before enter the league #MIvsGT #RohitSharma𓃵 #PBKSvsMI #ipl2025 #RoyalChallengersBengaluru #ViratKohli pic.twitter.com/b5ycVbG5r7
— kclarke (@karthic04666940) May 31, 2025
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी विविध कमेंट्स केल्या. काही लोकांनी म्हटले की गिल कसोटी कर्णधार होताच अहंकारी झाला आहे, म्हणूनच तो अहंकार दाखवत आहे. गिलला वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications