सानिया मिर्झाने कुणाला मांडीवर घेऊन प्रेमाने कुरवाळले? सर्वांसमोर म्हणाली."आय लव्ह यू"
सानिया मिर्झा, इंस्टाग्राम स्टोरी: आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम यांची मुलगी अनन्या बिर्ला नेहमीच चर्चेत असते. अनन्या बिर्ला स्वतःच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अनन्या बिर्ला आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने, टेनिस स्टार सानिया मिर्झाने अनन्या बिर्लाबद्दल एक खूपच क्यूट इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

सानिया मिर्झाने शेअर केली खास स्टोरी (Sania Mirza, Instagram story)
सानियाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अनन्या सानियाच्या मांडीवर डोके ठेवून आराम करताना दिसत आहे. या फोटोसोबत सानियाने लिहिले आहे की, "हॅपी बर्थडे माय फेवरेट अँड बेस्ट गर्ल... आय लव्ह यू टू मच." सानिया मिर्झा आणि अनन्या बिर्ला यांनी याआधीही एकमेकांसाठी सोशल मीडियावर प्रेम आणि पाठिंबा व्यक्त केला आहे.
सानिया मिर्झा आणि अनन्या बिर्ला यांच्यात दिसले जबरदस्त बॉन्ड
सानिया मिर्झा आणि अनन्या बिर्ला वेगवेगळ्या क्षेत्रांतून असल्या तरी त्या एक मजबूत नातेसंबंध (बॉन्ड) शेअर करतात. एकीकडे सानिया भारतातील सर्वात यशस्वी टेनिस खेळाडूंपैकी एक आहे, तर अनन्या बिर्ला एक यशस्वी गायिका, उद्योजिका आणि बिर्ला ग्रुपची वारसदार आहे. अब्जावधींची संपत्ती असूनही, अनन्या बिर्ला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप दिवसांपासून मेहनत करत आहे.
सानिया मिर्झाकडे आहे एवढी संपत्ती
रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झाची एकूण संपत्ती सुमारे २५ मिलियन डॉलर (जवळपास २१६ कोटी रुपये) आहे. ब्रँड एंडोर्समेंट्स, टेनिस करिअर, जाहिराती आणि व्यवसायातून तिला चांगली कमाई होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही सानिया वेगवेगळ्या भूमिकांमध्ये टेनिसशी जोडलेली असते. शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यापासून सानिया मिर्झा आपला मुलगा इझानसोबत अधिक वेळ घालवत आहे.












Click it and Unblock the Notifications