हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाप,पत्नी रितिका हिने मुलाला दिला जन्म
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहितची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला आहे. सोशल मिडीयातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी समजल्यानंतर चाहते खूप आनंदी झाले आहेत. सोशल मिडीयावर रोहीत आणि रितिका ट्रेंड करत असून चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. रोहित आणि रितिका यांचे हे दुसरे अपत्य आहे. याआधी त्यांना समायरा ही मुलगी आहे. समायरा यांचा जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहितच्या दुसऱ्या मुलाचा जन्म 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी झाला. मात्र याबाबत रोहित किंवा रितिकाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित भारताचे नेतृत्व करेल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, मात्र रोहित भारतातच आहे.

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित संघासह ऑस्ट्रेलियाला दौ-यावर गेला नाही. रोहित दुस-यांदा बाप झाल्यानंतर पहिला सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की कुटुंबासोबत काही वेळ घालवणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, तो सुरुवातीच्या कसोटीत खेळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले होते की, रोहित पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही याबाबत आपल्याकडे ठोस माहिती नाही. गंभीर म्हणाला होता की, याबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. येत्या काळात काय परिस्थिती आहे ते सांगू. तो उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे, मात्र याविषयी काही मालिका सुरू झाल्यानंतरच कळेल.












Click it and Unblock the Notifications