तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात दिसणार? BCCIच्या निर्णयाने चाहत्यांमध्ये उत्सुकता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. मालिकेत सध्या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून, लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला 2-1 अशी आघाडी घेण्याची संधी मिळणार आहे. अशा पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. BCCIने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हे दोघे दिग्गज खेळाडू मैदानात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रोहित-विराट निवृत्ती घेऊनही पुन्हा चर्चेत
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर होत असताना, सर्वात मोठा धक्का म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. हे दोघेही मालिकेतील काही सामने खेळण्यास इच्छुक होते, मात्र निवड समितीने त्यांची ही इच्छा मान्य केली नव्हती. त्यामुळे त्यांनी अधिकृतपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
लॉर्ड्सवर रोहित-विराट होणार उपस्थित?
सध्याच्या घडीला विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही इंग्लंडमध्येच असून, BCCIने त्यांना तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं आहे. यामागील उद्देश म्हणजे भारतीय संघातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि संघाचं मनोबल उंचावणं. त्यामुळे हे दोघे खेळाडू सामना खेळणार नसले तरी, ते मैदानात उपस्थित राहू शकतात.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची चांगली कामगिरी
या मालिकेत सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ठोस प्रदर्शन केलं आहे. तिसरा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे आणि अशा सामन्यात कोहली-रोहित यांसारख्या अनुभवी खेळाडूंची उपस्थिती संघाला मानसिकदृष्ट्या बळकटी देऊ शकते. दोघेही भारतीय क्रिकेटचे दिग्गज असून, त्यांच्या उपस्थितीमुळे लॉर्ड्सवरील वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण होणार आहे.
चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता
BCCIच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात खेळताना दिसणार नसले तरी, त्यांच्या उपस्थितीमुळे संघाला फायदा होईल, असा विश्वास अनेकांना आहे. त्यामुळे 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हे दोघे मैदानावर उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications