Rohit Sharma Net Worth : दुस-यांदा बाप झालेल्या रोहित शर्मा आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक
Rohit Sharma Net Worth : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. रोहितची पत्नी रितिका हिने एका मुलाला जन्म दिला आहे. या गोडी बातमीनंतर कुटूंब आणि चाहते खूप आनंदी झाले आहेत. सर्वच सोशल मिडीयावर प्लेटफॉर्मवर रोहीत आणि रितिका आज ट्रेंड करत असून चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. रोहित आणि रितिका यांचे हे दुसरे अपत्य आहे. याआधी त्यांना समायरा ही गोड मुलगी आहे. समायराचा जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झाला होता. तर जाणून घेऊया 'हिटमॅन'च्या नेटवर्थचा आढावा.

टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माची एकूण संपत्ती 215 कोटी रुपये आहे. पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि जाहिरातींमधून देखील चांगलीच कमाई करतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत A+ ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. या श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. त्यानुसार कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात.
रोहित शर्माची आयपीएलमधून कमाई
रोहितने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल प्रवासात खूप चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपये रुपयांची कमाई केली आहे. या लीगमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते.
रोहित शर्माचे कार कलेक्शन आणि आलिशान घर
रोहित शर्माचे मुंबईतील वरळी येथे 4 BHK फ्लॅट आहे. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. हा फ्लॅट जगातील 50 सर्वोत्तम उंच इमारतींपैकी एक आहे. येथून समुद्राचे 270 डिग्रीचे दृश्य दिसते. रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये Lamborghini Urus व्यतिरिक्त, BMW M5 (Formula One version) आणि Mercedes GLS 350d देखील आहे. BMW ची किंमत 1.55 कोटी रुपये आणि मर्सिडीजची किंमत 1.05 कोटी रुपये आहे. याशिवाय रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये BMW X3 आणि Toyota Fortuner सारख्या गाड्या आहेत.
रोहित आणि रितिका 2015 विवाह बंधनात अडकले
रोहित आणि रितिका दुस-यांदा आई-बाबा झाले आहेत. या दोघांनी 13 डिसेंबर 2015 रोजी एका भव्य विवाह सोहळ्यात लग्नबंधनात अडकले आहेत. रोहीत-रितिकाच्या विवाहसोहळ्यासाठी क्रिकेट, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. तीन वर्षांनंतर या जोडप्याने 2018 मध्ये समायरा जन्म दिला आहे. आता पुन्हा सहा वर्षांनंतर रोहितची पत्नी रितिका हिने गोड मुलाला जन्म दिला आहे.












Click it and Unblock the Notifications