खेळणार म्हणजे खेळणारचं ! भळभळती जखम असूनही ऋषभ पंत फलंदाजीसाठी सज्ज, बीसीसीआयची मोठी घोषणा!

भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे तो उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार, ऋषभ पंत मँचेस्टर स्टेडियमवर संघासोबत दाखल झाला असून, तो संघाच्या गरजेनुसार फलंदाजीसाठी उपलब्ध असणार आहे!

rishabh pant returns

विकेटकीपिंग नाही, पण बॅटिंगसाठी तयार

या अपडेटमुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. जरी पंत विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळू शकणार नसला, तरी त्याची फलंदाजी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल विकेटकीपिंगची धुरा सांभाळणार आहे.

दुखापतीतूनही कर्तव्यासाठी कटिबद्ध

ऋषभ पंतच्या या निर्णयामुळे त्याचे संघाप्रती असलेले समर्पण पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भळभळती जखम असतानाही तो संघासाठी फलंदाजीला उतरण्यास तयार आहे, हे त्याच्या जिद्दीचे आणि लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवते. त्याच्या या भूमिकेमुळे संघाचे मनोधैर्य निश्चितच वाढेल आणि प्रतिस्पर्धी संघावरही मानसिक दबाव वाढू शकेल. मँचेस्टर कसोटीत पंतच्या फलंदाजीचे प्रदर्शन कसे राहते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+