Rinku-Priya Engagement : रिंकू सिंह-प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न; फोटो अन् व्हिडिओ पाहिला का?
Rinku And Priya Engagement Photo and Video : लखनऊमध्ये नवाबी शैली आणि लखनऊ तहजीबमध्ये एक खास सोहळा पाहायला मिळाला. क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी (दि.8) साखरपुडा सोहळा संपन्न झाला.

या भव्य रिंग समारंभात तिनशे हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली, ज्यात राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे सपा अध्यक्ष अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, इकरा हसन आणि राम गोपाल यादव यांसारखे प्रसिद्ध नेते देखील या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात उपस्थित होते.
क्रिकेटर रिंकू सिंह और सांसद प्रिया सरोज की हुई सगाई.#rinkusingh #priyasaroj pic.twitter.com/OIe6i0MZ9e
— Vivek Awasthi (@VivekAwasthi89) June 8, 2025
प्रियाच्या वडिलांनी लग्नाबद्दल काय म्हटले?
क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाबद्दल, सपा आमदार आणि प्रिया सरोजचे वडील तूफानी सरोज म्हणाले की, आज साखरपुडा समारंभ आहे आणि आम्ही त्यासाठी येथे जमलो आहोत. प्रिया सरोज आज साखरपुडा करत आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे.
हे ही वाचा : क्रिकेटर रिंकू सिंह लग्नबंधनात अडकणार; 8 जून रोजी 'या' महिला खासदारासोबत होणार साखरपुडा
लग्नापूर्वी विचित्रा देवी मंदिरात आशीर्वाद घेतला
साखरपुडा सोहळा सुरु होण्यापूर्वी रिंकू त्याच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील चौधरा वाली विचित्रा देवी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते.
लखनऊमध्ये, दोघांनी फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवलेल्या फुलकरसन हॉलमध्ये रिंग सेरेमनी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर तसेच अनेक फोटो देखील आता पुढे आले आहेत.












Click it and Unblock the Notifications