Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

क्रिकेटर रिंकू सिंह लग्नबंधनात अडकणार; 8 जून रोजी 'या' महिला खासदारासोबत होणार साखरपुडा

Rinku Singh And MP Priya Saroj Marriage Date Fixed: भारतीय संघाचा क्रिकेटपटू तथा आयपीएलमधील केकेआर संघाचा धडाकेबाज खेळाडू रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा 8 जून रोजी लखनऊमध्ये साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. एका बड्या हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडेल, या कार्यक्रमाला कुटुंब आणि जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी जानेवारीमध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंह यांचे समाजवादी पक्षाच्या खासदाराशी असलेले नाते निश्चित झाले होते. त्यानंतर आता येणाऱ्या आठवडाभरात दोघांचाही साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे या जोडप्याच्या साखरपुडा नंतर लग्नाची तारीख देखील समोर आलेली आहे. ते 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत, असे देखील सांगण्यात आले.

priya saroj and cricketer rinku singh

कोण आहे प्रिया सरोज?

रिंकू सिंहची होणारी पत्नी ही समाजवादी पक्षाच्या (सपा) खासदार प्रिया सरोज आहे. 26 वर्षीय सरोज यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मच्छलीशहर मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी बीपी सरोज यांचा 35 हजार मतांनी पराभव केला होता.

प्रिया सरोज यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ रोजी वाराणसी येथे झाला. प्रियाने तिचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातून कला शाखेत पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने नोएडातील अ‍ॅमिटी विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली.

प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. तुफानी सरोज सध्या समाजवादी पक्षाच्या तिकीटावर केरकट मतदारसंघातून आमदार आहेत.

कशी जुळली प्रेमकहाणी, जाणून घ्या

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. जर तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर आम्ही त्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियाच्या एका मैत्रिणीचे वडील क्रिकेटपटू आहेत. ते रिंकू सिंहला चांगले ओळखतात. त्यांनीच पहिल्यांदा रिंकू आणि प्रियाची ओळख करून दिली. असेही म्हटले जाते की अलिगडमध्ये बांधलेले रिंकूचे नवीन घर प्रियानेच फायनल केले आहे.

लग्नात असेल व्हीआयपीचे आगमन

टिम इंडियामध्ये रिंकू सिंग एक प्रसिद्ध क्रिकेटपटू बनली आहे, तर प्रिया सरोज राजकारणातही बरीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर त्यांच्या लग्नात देशातील स्टार क्रिकेटपटू, राजकारणी, चित्रपट तारे आणि उद्योगपतींचा मेळावा होण्याची अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+