Ravichandran Ashwin : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त रविचंद्रन अश्वीनची संपत्ती किती? वाचा
Ravichandran Ashwin Net Worth : रविचंद्रन अश्विन हा भारताचा अत्यंत गुणी, शांत आणि संयमी फिरकी पटू असून त्याने आज चाहत्यांना धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या निवृत्तीची घोषणा अचानक झाल्याने फॅन फाॅलोवरला धक्का बसला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून खेळणे अपेक्षित होते पण ऐनवेळी असा निर्णय का घेतला याबद्दल आता चर्चा होत आहेत.
तर दुसरीकडे रोहीत शर्मा याने स्पष्ट केले की, अश्वीनने निवृत्तीबाबत पर्थ कसोटीवेळी मला सांगितले होते. त्यामुळे अश्विनची निवृत्तीची घोषणा पुर्वनियोजित आहे हे स्पष्ट होत आहे. अश्वीनने निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याच्या संपत्तीबाबत चर्चा सुरु आहेत. त्याच्याकडे किती संपत्ती आहे. त्याने क्रिकेटमधून किती कमाई केली अशा प्रश्नांची उत्तरे या लेखात आम्ही देत आहोत.

भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ही वेळ त्याने बरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतरची निवडली. भारत आणि आस्ट्रेलियादरम्यान मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यानंतर या स्टार गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे. या लेखात अश्विनच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया.
हेही वाचा : मोठी बातमी! रविचंद्रन अश्वीनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती! सामना होताच घोषणा, रसिकांना धक्का
287 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 765 विकेट
वन इंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, 38 वर्षीय अश्विन कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पर्थ कसोटीतही त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. अश्विनने भारतासाठी 287 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 765 विकेट घेतल्या आहेत. त्याने सहा कसोटी शतकांसह 4,394 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
हेही वाचा : India vs Bangladesh Test Match : रविचंद्रन अश्वीनने ठोकलं शतक! बांगलादेशविरुद्ध 339/6 धावा
106 कसोटीत 537 विकेट्स
अश्विनने निवृत्तीसह आपल्या 14 वर्षांच्या चमकदार कारकिर्दीचा शेवट केला, 106 कसोटीत 537 विकेट्स घेऊन तो भारताचा दुसरा विकेट घेणारा गोलंदाज बनला सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज. 38 वर्षीय अश्विनने 37 कसोटीत पाच बळी घेतले असून, मुथय्या मुरलीधरन (67) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
2024 सालापर्यंत, रविचंद्रन अश्विनची संपत्ती
2024 सालापर्यंत रविचंद्रन अश्विनची अंदाजे एकूण संपत्ती 132 कोटी रुपये (16 दशलक्ष अमेरिकन डाॅलर) आहे. त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे त्याची व्यावसायिक क्रिकेट कारकीर्द आणि ब्रँड एंडोर्समेंट. क्रिकेटमधील त्याचे सर्वाधिक उत्पन्न आयपीएलमधून येते. क्रिकेट जगतातील त्याच्या उंचीमुळे अश्विन अनेक ब्रँडशी व्यावसायिक कारणांमुळे जोडला गेला आणि यशस्वी ठरला, यामुळे त्याच्या नेट वर्थमध्ये भर पडत गेली.
हेही वाचा : Ind Vs Aus 3rd Test WTC final : गाबा टेस्ट ड्राॅ झाल्यास जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये भारत पोहचेल का?












Click it and Unblock the Notifications