Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उभरत्या भारतीय टेनिस खेळाडूची बापानेच केली हत्या! खरं कारण आलं समोर, 'ती' रिल्स बनवायची म्हणून..

Radhika Yadav Murder case : हरियाणाची राज्य स्तरीय खेळाडू असलेली टेनिसस्टार राधिका यादव हिचा खून करण्यात आला आहे. हा खून कुण्या परक्याने नव्हे तर ज्याने जन्म दिला त्याच बापाने केला आहे. ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर क्रीडाविश्व हादरले आहे.

अवघ्या पंचवीसाव्या वर्षी राधिका यादव हिला तिच्याच वडीलांनी गोळ्या झाडल्या, या हल्ल्यात ती मृत्यूमुखी पडली. दरम्यान, या प्रकरणी राधिकाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. एनआयच्या वृत्तानुसार, पोलिस आज दुपारी २ वाजताच्या सुमारास मृत राधिकाचे वडील दीपक यादव यांना गुरुग्राम न्यायालयात हजर करतील. एनआयनेही संदर्भात वृत्त दिले आहे.

Radhika Yadav Murder case

का मारले राधिकाला?

राधिकाला मारल्यानंतर तिच्या पित्याने हत्येची कबुली पोलिसांकडे दिल्याचे वृत्त आहे. मिडिया रपोर्टनुसार, दीपकने यावेळी म्हटले की, राधिका रिल्स व्हिडिओ बनवायची आणि त्यामुळे दीपकला याचा त्रास व्हायचा. राधिकाच्या रिल्समुळे लोक म्हणायचे की, "त्याच्या मुलीची वागणूक ठीक नाही, घराची इज्जत ती घालत आहे आणि तुम्ही गप्प बसलात.."

दीपक म्हणाला, "माझी मुलगी माझे ऐकत नव्हती"

दीपकने सांगितले की, "माझी मुलगी माझे ऐकत नव्हती" मी राधिकाला अनेकवेळा अकादमी बंद करायचे सांगितले पण ती माझे ऐकत नव्हती. मी तिला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण ती मलाच उत्तरं द्यायची"

इनामुल हकसोबत व्हिडिओचा संबंध?

वडिल दीपकने राधिकाचा खून केला नेमक्या त्याच दिवशी राधिकाच्या आईचा जन्मदिवस होता, आईच्या वाढदिवशीच लेकीला बापाने या जगातून कायमचे संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे सुत्रांचे म्हणणे आहे की, तिचे वडिल टेनिस अकादमी उघडल्याबद्दल आणि राधिका इनामुल हकसोबत व्हिडिओ आणि रील बनवल्याबद्दल वडील राधिका यादववर रागावले होते. एका व्हिडिओमध्ये राधिका इनामुल हकसोबत बाईकवर बसलेली होती, हे वडिलांना आवडले नाही अशी बाबही आता पुढे येत आहे.

यासंदर्भात राधिकाचे काका कुलदीप यादव यांनी सांगितले की, राधिकाचा खून करण्यात आला, तेव्हा आम्हाला गोळीबाराचा आवाज आला तेव्हा आम्ही आवाजाच्या दिशेने धावलो तेव्हा राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, माझा भाऊ दीपकने आपल्याच मुलीचा त्याच्याकडे परवाना असलेल्या बंदुकीतून त्याने राधिकावर गोळ्या झाडल्याचे कळले. दरम्यान, आम्ही राधिकाला रुग्णालयात नेले परंतु त्यापुर्वीच तिचा मृत्यू झाला. राधिकाच्या अकादमीबाबत दीपक नाराज होता त्यातून त्याने राधिकाचा खून केला असे ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणी दीपकवर खून केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+