Pro Kabbadi todays match : प्रो कबड्डी लीगमध्ये आज कुणाचा कुणाशी सामना आहे, जाणून घ्या
pro kabaddi league todays match : प्रो कबड्डी लीगमध्ये आज दोन सामने होणार आहेत.पहिला सामना यूपी योद्धा आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन महान संघांमध्ये होणार आहे. यानंतर दुसरा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यात चाहत्यांना रोमांच अपेक्षित आहे.
आतापर्यंतच्या सामन्यातील जयपूर आणि यूपीच्या कामगिरीचा आधार घेतला तर यूपीचा वरचष्मा असला तरी दमदार कामगिरीच्या जोरावर यूपीला पराभूत करण्याची क्षमता जयपूर संघात आहे.

यूपी योद्धा सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर
यूपी योद्धा सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यूपीने सहा पैकी तीन सामने जिंकले आणि तेवढेच सामने गमावले. जयपूरने स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती पण नंतर ती थोडी मागे पडल्याचे दिसले. जयपूर पिंक पँथर्सने 5 सामन्यांत 2 विजय मिळवून गुणतालिकेत आठवे स्थान पटकावले आहे. जयपूरचा एक सामनाही बरोबरीत सुटला.
दबंग दिल्ली आणि यू मुंबा बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ समान पातळीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत. दिल्लीनेही 6 सामने खेळल्यानंतर दोन सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. येथे दोन्ही संघ तिसऱ्या विजयाची पाहत आहेत.
गुणतालिकेत मुंबई नवव्या तर दिल्ली दहाव्या स्थानावर
गुणतालिकेत मुंबई नवव्या तर दिल्ली दहाव्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये स्पर्धा होऊ शकते. गुणांबाबत बोलायचे झाले तर मुंबईचे 14 गुण आहेत तर दिल्लीचे 13 गुण आहेत. इथेही दोघांमध्ये फारसा फरक नाही.












Click it and Unblock the Notifications