विराट कोहली प्रिती झिंटाला फोनवर काय दाखवत होता? प्रिती फोनवर बघून का हसत होती; आत्ता झाला खुलासा
IPL 2025 मध्ये २० एप्रिललला मुल्तानपूर येथे आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळविण्यात आला. या सामन्यांत आरसीबीने ७ गड्यांनी विजय मिळवला. विराट कोहलीने सामन्यांत ७३ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यानंतर प्रीती झिंटा आणि विराट कोहली एकत्र दिसले. आरसीबी आणि पीके यांच्यातील सामना संपताच, विराट कोहली आणि प्रीती झिंटा फोनवर हसताना दिसले. हे हसू कशाचे होते व ते फोनवर काय बघत होते, या चर्चा आता सुरु झाल्या. त्यानंतर प्रिती झिंटाने स्वतः या पोस्टचा खुलासा केला.

चाहत्यांच्या प्रश्नाला दिले उत्तर
विराट कोहली व प्रिती झिंटा फोनवर काय बघत होते, हा प्रश्न होता. या दोन्ही स्टार्सचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात विराट कोहलीच्या हातात फोन आहे आणि तो प्रीती झिंटाला काहीतरी दाखवत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तथापि, आता अभिनेत्री प्रीतीने स्वतः त्या दिवशी काय बोलत होते ते उघड केले आहे.
काय म्हणाली प्रिती?
प्रीती झिंटाच्या एका चाहत्याने तिला विचारले की ती आणि विराट कोहली त्या दिवशी कशाबद्दल बोलत होते. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, आम्ही दोघेही एकमेकांना आमच्या मुलांचे फोटो दाखवत होतो. त्याची दोन्ही मुले खूप गोंडस आहेत. हे पाहून आम्हाला हसू आले. प्रीती झिंटा म्हणाली की, जेव्हा ती १८ वर्षांपूर्वी तरुण विराट कोहलीला भेटली तेव्हा त्याच्यात प्रचंड उत्साह आणि प्रतिभा होती आणि आजही तीच ऊर्जा त्याच्यात आहे. तो खूप गोड माणूस आणि एक अद्भुत वडील आहे.
We were showing each other pictures of our children & talking about them ! Time does fly… When I first met Virat 18 years ago, he was a spirited teenager buzzing with talent & fire - today he still has that fire & is an icon & a very sweet & doting father ❤️ https://t.co/FNFXLRR7Wi
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 28, 2025
कसे आहे विराटचे आयुष्य?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलांबद्दल बोलायचे झाले तर, या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अनुष्का आणि विराट त्यांच्या दोन्ही मुलांबद्दल खूप संवेदनशील आहेत. या जोडप्याने आजपर्यंत सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचे चेहरे दाखवलेले नाहीत. माध्यमांनाही कॅमेरे दूर ठेवण्यास सांगितले जाते. तथापि, चाहते वामिका आणि अकेची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.












Click it and Unblock the Notifications