Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PAK vs BAN Head To Head: बांगलादेशने पाकचा किती वेळा पराभव केला? दोन्ही संघांचे वनडे रेकॉर्ड पहा

PAK vs BAN Head To Head : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 9 व्या सामन्यात पाकिस्तान विरुध्द बांग्लादेश संघ उद्या म्हणजे (ता.27 फेब्रुवारी) रोजी आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मात्र, पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्यावर असणार आहेत. कारण यजमान पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास अवघ्या 5 दिवसांत संपला.

दरम्यान त्यांना शेवटच्या सामन्यात विजय मिळवून त्यांच्या मोहिमेचा शेवट होणार की पराभवाची मालिका सुरुच राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Pakistan vs Bangladesh

पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेचा इतिहास शानदार राहिला आहे. तितकाच त्याचा अलीकडील फॉर्मही तितकाच खराब आहे. पाकिस्तान संघ आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ देखील बनला आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 984 सामने खेळले आहेत. त्यापैकी 520 सामने जिंकले आहेत तर 435 सामने गमावले आहेत.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हेड टू हेड रिकॉर्ड

एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड सामन्यांच्या रेकॉर्डनुसार पाकिस्तानने या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आतापर्यंतची स्पर्धा मोठ्या प्रमाणात एकतर्फी राहिली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 39 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी पाकिस्तानने 34 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बांगलादेशने आतापर्यंत फक्त 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर खेळलेले सर्व 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

बांगलादेश संघ- नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदया, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा.

पाकिस्तान संघ- मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+