Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला! NC क्लासिक स्पर्धेत पटकावले सूवर्ण, वाचा कामगिरी

Neeraj Chopra creates history in NC Classic 2025 : आधी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सूवर्ण, नंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर त्यानंतर डायमंड, गोल्डन स्पाईकमध्येही सूवर्णपदक मिळवणाऱ्या भारताचा गोल्डनबाॅय नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने एनसी क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.

बंगळुरू येथे श्री कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एनसी क्लासिक २०२५ स्पर्धेत त्याने ही दिमाखदार कामगिरी केली आहे. त्याने या काही महिन्यात सलग तीन सुवर्णपदक पटकावले आहे.

Neeraj Chopra creates history

एनसी क्लासिक स्पर्धा नीरजने कशी जिंकली?

आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत नीरजने ८६.१८ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेची खास गोष्ट म्हणजे ही स्पर्धा नीरज चोप्राच्या नावावर होती आणि तीच स्पर्धा जिंकून त्याने सिद्ध केले की तो केवळ नावाचाच नाही तर भालाफेकीतही राजा आहे. नीरज चोप्राची भालाफेक या स्पर्धेतील सर्वात लांब अंतराची होती. यासह त्याने केनियाचा ज्युलियस येगो आणि श्रीलंकेचा रमेश पाथिराज यांना मागे टाकले.

स्पर्धेचा निकाल काय?

  • भारताच्या नीरज चोप्राने ८६.१८ मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले.
  • ज्युलियस येगोने रौप्य पदक जिंकले. ज्युलियस येगोने ८४.५१ मीटर फेकून रौप्यपदक जिंकले.
  • श्रीलंकेच्या रमेश पाथिराजेने ८४.३४ मीटर फेकून कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

नीरजची या वर्षातील अलिकडची कामगिरी

मे २०२५ मध्ये डायमंड लिग जिंकली

भारताचा गोल्डनबाॅय नीरज चोप्राने मे २०२५ मध्ये पॅरिस डायमंड लीगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेत त्याने एक खास विक्रम रचला. जे ऑलिम्पिकमध्ये तो करू शकला नाही, ती कामगिरी त्याने 16 मे 20025 रोजी केली. त्याने आतापर्यंतची त्याची सर्वोत्तम कामगिरी करत ९०.२३ मीटरपर्यंत भाला फेकला. ही कामगिरी तो ऑलिम्पिकपेक्षाही सरस होती. एवढ्या लांब भाला फेकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रमही आहे.

जून २०२५ मध्ये गोल्डन स्पाईकमध्ये सुवर्णपदक

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत चेक प्रजासत्ताकातील ओस्ट्रावा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक २०२५ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.

नीरजसाठी ही स्पर्धा सुरुवातीला सोपी नव्हती. त्याचा पहिला थ्रो त्याचा फाउल (चुकीचा) ठरला, परंतु त्याने लगेचच जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८३.४५ मीटर, तर तिसऱ्या थ्रोमध्ये ८५.२९ मीटर इतकी मोठी फेक केली, जी संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरली आणि त्याने पहिल्या क्रमांक पटकावला.

५ जुलै २०२५ मध्ये एनसी क्लासिक स्पर्धा जिंकली

भारताच्या नीरज चोप्राने ८६.१८ मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+