Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'मी देशासाठी पदक जिंकायला नको होते,' दुःखी मनू भाकरने सोडले मौन, क्रीडा पुरस्कारांबद्दल मोठे वक्तव्य

Manu Bhakar's Latest Reactions On Sports Awards : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणारी भारताची स्टार निशानेबाज मनू भाकर हिचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांमध्ये नसल्याने तिचे वडील संतापले आहेत. मनू भाकरच्या वडिलांनी सांगितले की अर्ज केल्यानंतरही त्यांच्या मुलीचे नाव नामांकित खेळाडूंच्या यादीत आलेले नाही.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मुलीला शूटिंगमध्ये सामील केल्याबद्दल खेद वाटत असल्याचे सांगितले आहे. क्रिकेटर व्हायला हवे होते, त्यामुळे त्यांना पाठिंबा आणि बक्षिसे मिळाली असती असेही ते म्हणाले.

Manu Bhakar s Latest Reactions On Sports Awards

मनूने एकाच मोसमात दोन ऑलिम्पिक जिंकले

माझ्या मुलीकडून आणखी काय अपेक्षा करावी? असा सवाल करत मनूने एकाच मोसमात दोन ऑलिम्पिक जिंकले असेही ते म्हणाले, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. वडीलानंतर मनूचे वक्तव्य समोर आले आहे. त्यानुसार, "मी ऑलिम्पिकमध्ये जाऊन देशासाठी पदक जिंकायला नको होते." असे मनूने सांगितले. निराश होऊन तिने मी खेळाडू बनायला नको होते असेही म्हटले आहे.

पॅरिस ऑलम्पिकमध्ये इतिहास, मनू भाकरचा कास्यपदकावर नेम! भारताला पहिले पदक

मनू भाकरने अर्ज केला का?

मनू भाकरने अर्ज केलाच नाही, असे क्रीडा मंत्रालयाने सांगितले आहे पण तिच्या वडिलांची यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. मनूने सांगितले की, ती चार वर्षांपासून पद्मश्रीसारख्या पुरस्कारासाठी अर्ज करत आहे. काही वर्षांत, मनूने रोख पारितोषिकासाठी 49 अर्ज केले पण ते सर्व नाकारले गेले असे तिचे म्हणणे आहे.

Manu Bhaker: मनू भाकरची ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक हुकली! 25 मीटर पिस्तुलमध्ये चौथा क्रमांक पटकावला

ताज्या अहवालांवर विश्वास ठेवला तर मनू भाकरचे नाव यात समाविष्ट केले जाईल आणि क्रीडा पुरस्कारांची अंतिम यादी केली जाऊ शकते. तिचे नाव या यादीद्वारे समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालय हे करणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, क्रीडा मंत्री मनसुख मांडविया या शिफारशींवर एक-दोन दिवसांत निर्णय घेतील. त्या अंतिम यादीत मनू भाकरचे नाव येण्याची शक्यता आहे.

मनू भाकर-निरज चोप्रा खरंच लग्न करणार का? का होतेय चर्चा, मनूच्या आईच्या व्हायरल व्हिडिओत काय? वाचा

खेलरत्न पुरस्कारावर प्रश्नचिन्ह

मनू भाकरच्या वडिलांनी खेलरत्न पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केला आहे तर दुसरीकडे मनू भाकरचा मुद्दा सोशल मीडियावरही गाजत आहे आणि चाहत्यांकडून तिला भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले होते ही तिची मोठी कामगिरी ठरली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+