Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनू भाकर-निरज चोप्रा खरंच लग्न करणार का? का होतेय चर्चा, मनूच्या आईच्या व्हायरल व्हिडिओत काय? वाचा

भारताचे ऑलंपिक पदक विजेते मनू भाकेर आणि निरज चोप्रा, यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दोघांचे काही एकत्र व्हिडीओ व्हायरल झालेत. शिवाय मनू भाकेरची आई सुमेधा भाकर यांचाही एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुमेधा भाकर या निरजचा हात हातात धरून स्वतःच्या डोक्यावर ठेवत त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसताहेत...

या दोघांमधील हिच बातचीत लग्नाबाबतच तर नाही ना... अशा चर्चांना सध्या सोशल मीडियावर फूल टू उधाण आलंय... नेमकं काय आहे हे प्रकरण, हे आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...

Manu Bhakar - Neeraj Chopra Relationship Latest Sports News

मनू- निरजच्या दोघेही भारताचे स्टार खेळाडू

नीरज चोप्रा आणि मनू भाकर या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने नेमबाजीच्या स्पर्धेत एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. यासह, एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. दुसरीकडे, नीरज चोप्रा 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकत भारताला सहावे पदक मिळवून दिले.

मनूच्या आईचा निरजसोबतचा व्हिडीओ व्हायरल

मनू भाकेर आणि निरज चोप्रा हे स्पर्धातून मायदेशात परतले. त्यानंतर या दोघांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. शिवाय मनू भाकेरची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. या व्हिडिओमध्ये दोघेही उभे राहून बोलत आहेत.

या दरम्यान मनूच्या आईने नीरजचा घट्ट हात धरला आहे आणि काहीतरी बोलत आहेत. यासोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मनू भाकेर नीरजशी बोलताना दिसत आहे. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली, तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले.

दोघंही हरियानाचे असल्याने चर्चा वाढल्या

नीरज चोप्रा आणि मनू भाकेरच्या आईसोबतच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनू भाकेरची आई सुमेधा भाकेर भालाफेकपटू नीरज चोप्राशी बोलत आहेत. यादरम्यान त्या नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणातात माझी अशी इच्छा आहे की... आणि आजूबाजूला जास्त आवाज असल्याने नेमकं त्यांचं काय बोलणं झाल आहे हे ऐकू आलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनू- निरजच्या लग्नाच्या चर्चा वाढल्या. नीरज चोप्रा आणि मनू भाकेर हे दोघेही हरियाणामधील असल्याने या चर्चांनी जास्त जोर धरला.

मनूच्या आईने नेमकं काय चर्चा केली

मनूच्या आईचा आणि निरजचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक युजर्सने वाट्टेल ते लिहलं. एकाने म्हटलं - लग्नाची चर्चा आहे. दुसऱ्याने म्हटलं की, 'एक भारतीय आई तिच्या मुलीच्या लग्नाबद्दल एका यशस्वी मुलाशी बोलत आहे.' तिसऱ्या युझरने म्हटले, 'मम्मी जावई शोधण्याच्या मोहिमेवर आहे.' एकजण पुढे म्हणाला - बेटा, माझ्या मुलीशीच लग्न कर.

वास्तविक ही चर्चा वेगळी होती. मनू भाकरची आई निरजला म्हणत होती, तू टेन्शन घेणार नाही, अशी शपथ घे. असं म्हणत मनू भाकरची आई नीरजचा हात घेऊन डोक्यावर ठेवते. विश्रांती घे आणि नंतर अधिक मेहनत कर, असं त्याला म्हणते. मात्र व्हिडीओतील संवाद न ऐकताच यूजर्ननी वेगवेगळ्या चर्चा सुरु केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+