पॅरिस ऑलम्पिकमध्ये इतिहास, मनू भाकरचा कास्यपदकावर नेम! भारताला पहिले पदक
नवी दिल्ली - पॅरिस ऑलम्पिकमध्ये इतिहास घडला असून भारताला पहिले पदक मिळाले आहे. भारताच्या मनू भाकर हिने 'कास्य'पदकावर नेम साधला असून भारताला नेमबाजीत सुवर्ण मिळाले आहे. या पदकासोबतच भारताचे पदकाचे खाते उघडले आहे.
मनू भाकर हिने सामन्यात चिनी खेळाडूंपेक्षा सरस कामगिरी केली. तिने तिसऱ्या स्थान कायम राखत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. त्यानंतर अखेरचा शाॅट मिळवणे बाकी होते. त्यात तिने अखेरच्या क्षणी पाॅइंट वनने ती मागे पडली. ती २२१.७ गुण मिळवत तिने कास्यपदकाला गवसणी घातली.

- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले.
- ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिने 221.7 गुण मिळवले.
- कोरियाच्या ओ ये जिनने या स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिने 243.2 गुण मिळवून ऑलिम्पिक विक्रम केला.
- कोरियाच्याच किम येजीने रौप्यपदक जिंकले. तिने 241.3 गुण मिळवले.
मनूच्या घरी आनंदोत्सव
पॅरिस ऑलम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणाऱ्या मनू भाकर हिच्या हरियानातील घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मनूच्या आजीला पेढेही भरवण्यात आले. मी माझ्या नातीचा मोठा सत्कार करणार असल्याचंही मनूच्या आजीने सांगत आपल्याला मोठा आनंद झाल्याचंही सांगितलं.

2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूचे पिस्तूल तुटले. तिला 20 मिनिटे लक्ष्य करता आले नाही. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनूला केवळ 14 शॉट्स मारता आले आणि ती अंतिम शर्यतीतून बाहेर पडली होती. त्यामुळे मनू निराश झाली होती. यंदा मात्र तिने पॅरिस ऑलम्पिकमध्ये पदक जिंकून तिने मागील कामगिरीचे आणि त्या घटनेची परतफेड केली.
- पात्रता फेरीच्या पहिल्या मालिकेत भाकरने 97 गुण मिळवले आणि ती चौथ्या स्थानावर राहिली. दुसऱ्या मालिकेतही तिने 97 गुण मिळवत आपला फॉर्म कायम ठेवला.
- भाकरने तिसऱ्या फेरीत 98 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर पुनरागमन केले. त्यानंतर पाचव्या फेरीत 8 धावा करूनही (खराब शॉट) नंतरही मनू भाकर स्पर्धेत राहिली आणि अखेरीस तिने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.
अवघ्या 16 व्या वर्षी, तिने 2018 मध्ये ग्वाडालजारा येथे ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने आणखी एक सुवर्णपदक जिंकले.
भारताची पहिली महिला नेमबाज
मनू 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली. तिने ISSF विश्वचषक स्पर्धांमध्येही अनेक पदके जिंकली आहेत आणि अभिषेक वर्मासह जकार्ता येथील आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
देशांतर्गत आघाडीवर, भाकर हिने अनेक विजेतेपदे जिंकून आणि राष्ट्रीय विक्रम रचून आपले कौशल्य दाखवले आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाचा 2020 मध्ये प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला.












Click it and Unblock the Notifications