धक्कादायक क्रिकेट खेळताना हार्टअटॅक! 35 वर्षीय बॅट्समनचा मृत्यू; जालन्यात मुंबईच्या खेळाडूसोबत घटना
Jalna News Heart Attack While Playing Cricket : रंगमच असो वा क्रिकेट किंवा फुटबाॅल खेळ खेळताना हार्ट अटॅक आल्याची आणि मृत्यू झाल्याच्या घटना कधी ना कधी कानावर येतेच. सध्या हिवाळा सुरु असून या दिवसांत हृदयविकार वाढण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. प्रसंगी हार्ट हार्ट अटॅकही येतो. अशीच एक घटना महाराष्ट्रातील जालना शहरात घडली आहे.
क्रिकेट खेळताना फलंदाजाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. या खेळाडूच्या छातीत कळा आल्यानंतर तो कोसळला, दरम्यान इतर खेळाडूंनी प्रयत्न केले पण या फलंदाजाचा मृत्यू झाला. या प्रकाराने जालन्यातील क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

जालन्यातील फ्रेजर बाॅईद शाळेच्या मैदानावर होती स्पर्धा
जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर आज सकाळी क्रिकेटची स्पर्धा होती ख्रिसमसनिमित्त या ख्रिसमस ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आज क्रिकेट सामन्यात सकाळी बॅटिंग करणाऱ्या 35 वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू झाला. विजय पटेल असं मृत खेळाडूच नाव असून, तो मुंबईतील नालासोपारा भागातला रहिवासी आहे.
हेही वाचा : सायलेंट हार्ट अटॅक हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात मोठा धोका, जाणून घ्या त्यामागील मुख्य कारण
हृदयविकाराचा झटका का येतो? कारण काय?
हृदयविकाराच्या झटक्यामागे अनेक विशेष कारणे आहेत. सर्वात सामान्य कारण म्हणजे वय. विशेषत: 45 वर्षांवरील पुरुष आणि 55 वर्षांवरील महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. इतर कारणांमध्ये धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, चुकीचा आहार, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, तणाव, अनुवांशिक घटक आणि व्यायामाचा अभाव यांचा समावेश होतो. या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत त्याची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.
हेही वाचा : AI : हार्ट फेल्युअर आहे की नाही हे सांगेल इस्त्रायलचे AI तंत्र! वाचू शकतील असंख्य लोकांचे जीव
हृदयविकाराची लक्षणे काय आहेत?
छातीत दुखणे
तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मते, हृदयविकाराचे सर्वात खास लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना किंवा दाब जाणवणे. ही वेदना जडपणा, जळजळ किंवा जडपणासारखी असू शकते, जी काही मिनिटे टिकते किंवा पुन्हा पुन्हा येते.
खांदा दुखणे
छातीत दुखण्याबरोबरच हे दुखणे शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकते, जसे की खांदे, पाठ, मान, जबडा, दात किंवा काहीवेळा पोटाच्या वरच्या भागातही वेदना जाणवू शकतात. ही वेदना हळूहळू किंवा अचानक होऊ शकते.
थकवा आणि चक्कर येणे
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान एखाद्या व्यक्तीला अधिक थकवा जाणवू शकतो. याशिवाय अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध वाटणे हे देखील त्याचे लक्षण आहे.
घाम येणे आणि श्वास लागणे
जर एखाद्या व्यक्तीला विनाकारण घाम येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. ही लक्षणे विशेषतः अशा लोकांमध्ये आढळतात ज्यांना आधीच हृदयाची समस्या आहे.
मळमळ आणि उलट्या
हृदयविकाराच्या काही प्रकरणांमध्ये, पोटाशी संबंधित लक्षणे देखील दिसू शकतात, जसे की मळमळ, उलट्या किंवा पोटात जडपणा किंवा अपचनाची भावना. लोक सहसा या लक्षणांकडे सामान्य पचन समस्या म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकतात.
हेही वाचा : World Heart Day 2024 : हार्ट अटॅकनंतर किती वेळानंतर शारीरिक संबंध ठेवावेत? 'या' खास 7 टीप्स












Click it and Unblock the Notifications