AI : हार्ट फेल्युअर आहे की नाही हे सांगेल इस्त्रायलचे AI तंत्र! वाचू शकतील असंख्य लोकांचे जीव
AI: इस्रायलमधील संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र (artificial intelligence) शोधून काढले आहे. जे ECG चाचण्यांचे विश्लेषण करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासंबंधी अचूक अंदाज लावण्यास सक्षम आहे. यामुळे तुम्हाला हृदविकास कितपत आहे आणि तुमचे हृदय फेल होऊ शकते का याची माहितीही समजणार आहे.
भारतात हृदयविकार ही मोठी आरोग्यविषयक समस्या बनली आहे. या समस्येमुळे अनेक व्यक्तींचे ऐन तारुण्यातच मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही मोठी समस्या असून व्यक्तीच्या अकाली निधनामुळे कुटुंबालाही नंतर मोठे परिणाम भोगावे लागतात हेही दिसून आले आहे.

दरवर्षी सुमारे 17.9 दशलक्ष लोकांचा या आजाराने मृत्यू
हृदयविकार हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी सुमारे 17.9 दशलक्ष लोकांचा Cardiovascular diseases अर्थात हृदयरोगामुळे मृत्यू होतो. पण आता एक इस्रायली AI डिव्हाइस अशा लोकांचा जीव वाचविण्यात मदत करू शकतो. ही कृत्रिम बुद्धिमत्ता साधने हृदयाची स्थिती, हृदय किती काम करते, याचा उच्च अचूकतेसह अंदाज लावू शकतात. त्यामुळे हॉर्ट फेल्युअर होण्याआधीच सर्व गोष्टी वेळीच निस्तरता येणार आहेत.
नवीन तंत्रज्ञान विशेषत: मायोसिटिस किंवा स्नायूंचा दाह असलेल्या रुग्णांवरही केंद्रित आहे. ही स्थिती हृदय फेल होण्याचा धोका आहे अशा अर्थाने ओळखली जाते. हॉर्ट फेल्युअरचा अंदाज लावण्यासाठी हे उपकरण ईसीजी चाचणीचे विश्लेषण करण्यासाठी आहे.
इस्रायली एआय उपकरण
टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, सध्या हे तंत्रज्ञान मायोसिटिसने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वापरले जात आहे. मायोसिटिस ही अशी स्थिती आहे जी हार्ट फेल्यूअरचा धोका वाढवते. इस्रायली AI उपकरण 80% अचूकतेसह हॉर्ट फेल्युअरचा अंदाज लावू शकतो. 2000 ते 2020 या काळात मायोसिटिसने ग्रस्त असलेल्या 89 रुग्णांच्या ईसीजी स्कॅन आणि वैद्यकीय नोंदींचा डेटा देऊन एआय मॉडेल अपडेट केले गेले.
या अहवालात असाही दावा केला जात आहे की AI ECG मधील पल्स पॅटर्न समजू शकते आणि वेळेपूर्वी हृदयाशी संबंधित अपयशाचा अंदाज लावू शकते असं या संशोधनाचे प्रमुख असलेले रामबम हेल्थकेअर कॅम्पसच्या डॉ. शहार शैली यांनी टाइम्सला सांगितले. इस्रायलचे हे पहिले एआय होते जे केवळ रुग्णांसाठी तयार केले गेले होते.
शैली म्हणाली, "आम्ही AI मॉडेलद्वारे ECG चाचण्या करत आहोत, ज्यात डॉक्टर सामान्यपणे ओळखू शकत नाहीत हे लक्षात घेता, लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
राष्ट्रीय वैद्यकीय ग्रंथालयात प्रकाशित झाला संशोधन अहवाल
डॉ. शाहर शैला यांचे संशोधन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हृदय अपयशाचा धोका कोणाला होता? हा अभ्यास मायोसिटिस रूग्णांच्या ईसीजी चाचण्यांवर अल्गोरिदम चालवून आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारांशी तुलना करून करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications