Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

World Heart Day 2024 : हार्ट अटॅकनंतर किती वेळानंतर शारीरिक संबंध ठेवावेत? 'या' खास 7 टीप्स

World Heart Day 2024 : हृदयरोग जो कधी ना कधी कुणाच्या वाट्याला येणारा आजार. आजकालच्या स्पर्धेच्या आणि धाकाधकीच्या जीवनात बहुतांशजण हृदयरोगाच्या कठीण काळातून जात अशतात. जर कुणाला हृदयविकाराचा झटका आला तर उपचार केले जातात पण शारिरिक संबंध ही अशी क्रिया आहे जिथे हृदयाचे ठोके वाढतात आणि त्याचमुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हृदयविकाराच्या आजारानंतर शारिरिक संबंध ठेवण्याची योग्य काळ कधी असेल ते..

हृदयविकाराच्या झटक्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ व्यक्तीची शारीरिक स्थिती, उपचार प्रक्रिया आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असते . हृदयरोग्यांनी लैंगिक क्रिया करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. कारण ही क्रिया देखील शारीरिक श्रमासारखी आहे, ज्यामुळे हृदयावर दाब येतो. साधारणपणे, हृदयविकाराच्या झटक्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी किमान 4-6 आठवडे थांबण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

World Heart Day 2024

कधी करु शकता संबंध...

आजाराच्या कालावधीत आपली स्थिती काय असते हे सर्वांना माहित आहे पण ही स्थिती फार काळ राहतेच असे नाही. त्यामुळे संबंध कधी करता येईल हा प्रश्न कालांतराने पडू शकतो. तर सांगायचे म्हणजे हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर या कालावधीत हृदयाची स्थिती आणि व्यक्तीची पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन डॉक्टर मार्गदर्शन करतात. जर ती व्यक्ती कोणत्याही अस्वस्थतेशिवाय सामान्य गोष्टी करु शकते, उदाहरणार्थ दोन किंवा तीन मजले पायऱ्या चढणे किंवा 20-30 मिनिटे चालणे असे करु शकत असेल तर हे शरीर लैंगिक क्रियाकलापांसाठी तयार असल्याचे लक्षण असू शकते.

संबंध ठेवण्यापुर्वी हृदरोगींसाठी खास टीप्स

1. डॉक्टरांचा सल्ला घ्या

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, शारीरिक स्थिती, हृदयाचे कार्य आणि औषधांचा परिणाम लक्षात घेऊन ते तुम्हाला योग्य वेळ आणि दिशा देतील.

2. थकवा असेल तर थांबा..

तुम्हाला थकवा जाणवत असेल, छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब थांबा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि संबंधांसाठी गडबड करु नका.

3. योग्य पोझिशन निवडा

संबंध ठेवताना, तुमच्यासाठी आरामदायक आणि हृदयावर जास्त दबाव येणार नाही अशी स्थिती निवडा. शरीरावर कमी ताण असलेल्या परिस्थितींना प्राधान्य द्या.

4. मानसिकदृष्ट्या स्वतःला तपासा

गोल्डन अवर दरम्यान योग्य कृती करून धोका कमी केला जाऊ शकतो, तज्ज्ञांनी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत त्याचे महत्त्व सांगितले. हे सामान्य आहे, परंतु लैंगिक संबंधांसाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला जेणेकरून कोणतीही भीती किंवा चिंता कमी होईल.

5. औषधी आणि लैंगिक संबंधांवरील परिणाम

काही जाणकारांच्या म्हणण्यांनुसार, कधीकधी हृदयविकाराच्या झटक्यानंतर दिलेली औषधे (जसे की बीटा-ब्लॉकर) लैंगिक क्षमतेवर परिणाम करू शकतात. तुम्हाला लैंगिक क्षमता कमी होत असल्यास, त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. डॉक्टर औषधे किंवा इतर उपायांमध्ये बदल सुचवू शकतात.

6. ताण-तणाव कमी करा

ताण-तणाव आणि चिंता हृदयासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे संबंध ठेवताना मन शांत असणे, जास्त आराम मिळणे आणि शांतता राखणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची चिंता टाळण्यासाठी आपल्या जोडीदाराशी खुला संवाद साधा.

7. संतुलित आहार आणि व्यायाम

शारीरिक संबंध सुरू करण्यापूर्वी, शरीर मजबूत करण्यासाठी आणि हृदयाची क्षमता सुधारण्यासाठी नियमित हलका व्यायाम करा. सकस आणि संतुलित आहार घ्या.

(टीप: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. Oneindia या लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहिती निश्चिती करत नाही. कृपया कोणतीही माहिती आणि धारणांची कृती करण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+