वेगवान गोलंदाज दीपक चहर आता मुंबई संघात दाखल; MIने त्याला कितीमध्ये केले खरेदी?
IPL 2025 Mega Auction Day 2, Deepak Chahar : इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे.
पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

दरम्यान, लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आता दीपक चहरला मुंबई इंडियन्सने घेतले आहे. तो गेल्या आयपीएलमध्ये चेन्नईसाठी खेळत होता. परंतु, यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करून त्यांच्या संघात समावेश केला. दीपकवर 9.25 कोटींना विकत घेतले. त्याची मुळ किंमत 2 कोटी रुपये होती. गेल्या मोसमात त्याने चेन्नईसाठी 8 सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या.
ऋषभ पंतवर लखनौने 27 कोटींना खरेदी केले
ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान आज वेगवान गोलंदाज दीपक चहर मुंबई संघात दाखल झाला आहे. त्याची 9.25 कोटींना खरेदी झाली आहे.












Click it and Unblock the Notifications