बूट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, आज तो कोटींचा मालक बनला; जसप्रीत बुमराहची संपत्ती किती?
Jasprit Bumrah Networth : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करून यशाचा नवा इतिहास रचला आहे. क्रिकेट चाहत्यांना या विजयाने आनंद झालेला आहे. तर सोशल मीडियावर लोक बुमराहसह टीम इंडियाचे कौतुक देखील करू लागले आहेत.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, सगळीकडे फक्त 'बूम-बूम' बुमराह असा स्लोगन सद्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया, जसप्रीत बुमराहची कारकिर्द. त्याला टीम इंडियामध्ये येण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. एकेकाळी ज्याच्याकडे बूट-चप्पल खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, तो बुमराह आता किती कोटींचा मालक बनला आहे.

कुटुंबाविषयी...!
अहमदाबादच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या बुमराहने वयाच्या 5 व्या वर्षी वडील गमावले. आईने जसप्रीत बुमराहला प्रत्येक पावलावर साथ दिली. बुमराहच्या आईने घर आणि बाहेरची स्वत:वर घेतली. परंतु तिने कधीही बुमराहची स्वप्ने आणि आवड रोखण्याचा प्रयत्न केला नाही, उलट त्याला सातत्याने साथ देत त्याच्या स्वप्नांना उभारी देण्याचे काम केले.
बुमराहची क्रिकेटची आवड कपिल देव, वसीम अक्रम आणि वकार युनूस यांसारख्या दिग्गजांकडून प्रेरित होती. या उत्कटतेने त्याला एक अद्वितीय गोलंदाजी शैली विकसित करण्यास प्रवृत्त केले. जे जागतिक स्तरावर त्याचे वैशिष्ट्य मानले जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक वेळ अशी होती जेव्हा जसप्रीतकडे क्रिकेट किट आणि शूज घेण्यासाठीही पैसे नव्हते. यासंदर्भात स्वत: जसप्रीत बुमराहच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते.
बुमराह करोडोंचा मालक
दरम्यान, भारतीय संघात आल्यानंतर बुमराहने त्याच्या बॉलिंगच्या जोरावर बरेच काही कमावले आहे. आता बुमराह करोडोंचा मालक आहे आणि लक्झरी लाइफ जगतो आहे, बुमराहची आईने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो. जसप्रीत आज जे काही आहे ते त्याच्या रात्रंदिवस मेहनत आणि देवाच्या कृपेमुळे आहे. बरं, बुमराहच्या संघर्षाचा तो काळ निघून गेला आहे आणि आज तो करोडोंचा आहे आणि लक्झरी लाइफ जगतो आहे, तो क्रिकेटचा आयकॉन आणि युवकांसाठी प्रेरणादायी बनलेला आहे.
स्पोर्ट्सकीडानुसार, जसप्रीत बुमराहची जानेवारी 2024 पर्यंत एकूण संपत्ती 7 दशलक्ष रुपये (55 कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे, त्याला BCCI कडून चांगला पगार मिळतो. याशिवाय तो जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. जसप्रीत बुमराह अनेक धर्मादाय आणि मदत मोहिमांमध्येही योगदान देतो, अशी माहिती आहे.
बुमराह कशातून उत्पन्न कमावतो
बीसीसीआय करार : जसप्रीत बुमराह हा बीसीसीआयचा 'ए+ ग्रेड' श्रेणीचा खेळाडू आहे, ज्या अंतर्गत त्याला वर्षाला सुमारे 7 कोटी रुपये पगार मिळतो. ही रक्कम त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदानासाठी देण्यात आली आहे.
IPL : बुमराह इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याची फी प्रत्येक हंगामात सुमारे 12 कोटी रुपये आहे. आयपीएल त्यांच्या एकूण उत्पन्नात मोठा हिस्सा जोडते.
जाहीरात आणि ब्रॅड अॅम्बेसेडर : बुमराह पुमा, एसजी, ड्रीम 11 आणि बोस सारख्या अनेक मोठ्या ब्रँडशी संबंधित आहे. या ब्रँड्ससोबत त्याचे लाखो रुपयांचे सौदे झालेले आहेत. अंदाजानुसार, तो प्रत्येक जाहिरातीसाठी 1-2 कोटी रुपये आकारतो.
मालमत्ता आणि गुंतवणूक: बुमराहकडे मुंबईत एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत करोडो रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे अनेक आलिशान कार आणि इतर गुंतवणूकही आहे.












Click it and Unblock the Notifications