IPL 2025 : कागिसो रबाडाने आयपीएल सोडण्याबाबत केला मोठा खुलासा; स्वत:ला दोषी मानत माफीही मागितली
IPL 2025, Kagiso Rabada Latest News : आयपीएल २०२५ ची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला खेळ सोडावा लागला, अन् खेळाडू मायदेशी परतला. त्यावेळी वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. परंतु, रबाडाने आयपीएल का सोडले, याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. एका निवेदनाद्वारे सर्व गोष्टींचा खुलासा करत ड्रग्ज टेस्टमध्ये तो कसा अडकला याबाबत त्याने प्रामाणिकपणे खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने अखेर आयपीएल सोडण्याबाबत आपले मौन तोडले. गुजरात टायटन्सकडून खेळणारा रबाडाला ड्रग्ज टेस्टमध्ये अडकला. त्यानंतर त्याने अचानक आयपीएलमधून एक्झीट केली अन् थेट मायदेशी दक्षिण आफ्रिका गाठले. त्यावेळी तो का निघून केला याचा कोणताही खुलासा झालेला नव्हता. परंतु, आता रबाडाने स्वत:हून चूक मान्य केली आहे. यासंदर्भात त्याने निवेदन जारी केले.

गुजरात टायटन्सने कितीला केले होते खरेदी?
गुजरात टायटन्सने रबाडाला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो या हंगामात फक्त 2 सामने खेळू शकला. यानंतर, अचानक 2 एप्रिल रोजी, रबाडा आयपीएल अर्ध्यावर सोडून देशात परतला. त्यानंतर असे म्हटले गेले की तो वैयक्तिक कारणांमुळे परतला आहे.
2 मे रोजी गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी, 3 मे रोजी, रबाडाने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन (SACA) चा हवाला देत एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले की, त्याचा ड्रग टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला अचानक आयपीएलमधून परतावे लागले. रबाडाने असेही सांगितले की सध्या त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आलेले आहे.
Kagiso Rabada confirms in a statement through South Africa’s players union that he is currently serving a provisional suspension after testing positive for a recreational drug pic.twitter.com/gUd9Uu1Vhu
— Ali Martin (@Cricket_Ali) May 3, 2025
रबाडा निवेदनात नेमकं काय म्हणाला?
रबाडाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, अलिकडेच मी आयपीएल सोडले आणि वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेला परतलो. हे घडले कारण ड्रग्जच्या वापराबद्दलचास माझा अहवाल हा चिंताजनक होता. जे माझ्यामुळे निराश झाले, त्यांची मी माफी मागतो. मी क्रिकेट खेळण्याचा अधिकार कधीही हलक्यात घेणार नाही. हा अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे. तो माझ्या वैयक्तिक आकांक्षांपेक्षाही वरचा आहे.
निवेदनात रबाडा पुढे म्हणाला की, सध्या तो तात्पुरता निलंबित आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास उत्सुक आहे. या परिस्थितीत पाठिंबा दिल्याबद्दल रबाडाने एसएसीए, गुजरात टायटन्स, त्यांचे एजंट आणि कायदेशीर सल्लागारांचे आभार मानले आणि म्हटले की त्यांच्या कुटुंब आणि मित्रांशिवाय ते यातून बाहेर पडू शकले नसते. रबाडाने अशी आशा व्यक्त केली. ही चूक त्याच्या पुढील कारकिर्दीस कारणीभूत ठरणार नाही. पुढे जाण्यासाठी मी अधिक मेहनत करेल.












Click it and Unblock the Notifications