'या' समालोचकावर विराट कोहलीचा भाऊ का भडकला? 200 च्या वर सरासरीबद्दल बोलणं सोपं असतं! हे दिलं उत्तर
IPL 2025 Virat Kohli's brother Vikas Kohli gets angry at Sanjay Manjrekar : आयपीएलचा हंगाम सुरु आहे आणि त्यातच भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली चांगलाच फार्मात आहे पण त्याचा भाऊ विकास कोहलीची सोशल मिडिया पोस्ट आता चर्चेत आहे. या पोस्टद्वारे त्याने एका प्रसिद्ध समालोचकाला प्रत्युत्तर दिले आहे.
विराट कोहली भारताचा स्टार तर आहेच पण आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर बंगळुरूकडून खेळताना त्याच्या बॅटमधून सारख्या धावा निघत आहेत. त्याने या हंगामात आतापर्यंत सहा अर्धशतकं लगावली आहेत.

विराट कोहली फार्मात असताना आणि चांगल्या धावा करत असतानाही भारताचे माजी क्रिकेटपटू आणि आताचे प्रसिद्ध
समालोचक संजय मांजरेकर यांनी त्यांच्या एक पोस्ट सोशल मिडिया अकाऊंटवर टाकली आहे.
संजय मांजरेकरांची काय आहे ती पोस्ट?
संजय मांजरेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये आयपीएल खेळणाऱ्या सध्याच्या जास्तीत जास्त सरासरी असलेल्या खेळाडूंना क्रमानुसार, स्थान दिले आहे, ज्यांनी केवळ भरपूर धावा केल्या नाहीत तर त्यांचा स्ट्राइक रेटही खूप जास्त आहे.
संजय मांजरेकरांवर विराट कोहलीचा भाऊ का भडकला?
संजय मांजरेकर यांनी त्यांच्या यादीत विराट कोहलीचा समावेश केला नाही, जो या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे परंतु त्याचा स्ट्राइक रेट इतरांपेक्षा कमी आहे हेच कारण यादीत सहभागी करुन न घेण्याचे आहे आणि यामुळेच विकास कोहलीने संजय मांजरेकर यांच्या या यादीला
प्रत्युत्तर दिले आहे.
Virat Kohli’s brother Vikas Kohli on threads pic.twitter.com/a7FXKsODR0
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) April 29, 2025
काय आहे विकास कोहलींची पोस्ट?
संजय मांजरेकर यांच्या पोस्टवर विराटचा भाऊ विकास कोहली यांनी प्रतिक्रीया दिली. जी राॅयल चॅलेंजर बंगळुरू संघाने त्याचा स्क्रिनशाॅट आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. संजय मांजरेकर यांना उत्तर देताना विकास कोहली म्हणतात,
"मिस्टर मांजरेकर ..
वनडेमध्ये स्ट्राईक रेट 64.31,
200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटबद्दल बोलणं सोपं असतं!"
काय आहे संजय मांजरेकर यांची पोस्ट?
When it comes to batting only list that matters.Big runs with great SR so far.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) April 26, 2025
Pooran : 377 runs SR 205
Priyansh Arya : 254 runs SR 202
Shreyas : 263 runs SR 185
Surya : 373 runs SR 167
Buttler : 356 runs SR 166
Mitchell Marsh : 344 runs SR 161
Travis Head: 261 runs SR…
फलंदाजीचा विचार केला तर फक्त यादीच महत्त्वाची असते. आतापर्यंतच्या सर्वोत्तम सरासरीसह मोठे धावा.
- निकोलस पूरन: 377 धावा सरासरी 205
- प्रियांश आर्य: 254 धावा सरासरी 202
- श्रेयस अय्यर : 263 धावा सरासरी 185
- सूर्यकुमार यादव : 373 धावा सरासरी 167
- जोश बटलर: 356 धावा सरासरी 166
- मिशेल मार्श: 344 धावा सरासरी 161
- ट्रॅव्हिस हेड: 261 धावा सरासरी 159
- क्लॅसेन: 288 धावा सरासरी 157
- केएल राहुल : 323 धावा सरासरी 154
- शुभमन गिल: 305 धावा सरासरी 153
अशी यादी संजय मांजरेकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर प्रसिद्ध केली आहे.












Click it and Unblock the Notifications