टीम इंडीयाचा कर्णधार रोहीत शर्माच्या कुटूंबात कोण-कोण आहे, कसं आहे कुटूंबाशी नातं घ्या जाणून
Happy Birthday Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा उद्या आपला 38वा वाढदिवस साजरा करणार आहे. आयपील 2025 च्या सीझनमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यात रोहीतच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. मात्र मागील दोन सामन्यात रोहीत शर्माने दोन अर्धशतक करुन दमदार पुनरागमन केलं आहे.
रोहीत शर्माच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच किक्रेट उत्सुक असतात. रोहीत शर्मा ही फॅमिलीसोबत पिकनीकला गेल्यानंतर आपल्या कुटूंबाचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करतो असतो. या दरम्यान रोहीत शर्माच्या कुटूंबात कोण कोण आहे, जाणून घेऊया.

रोहित शर्मा यांनी 13 डिसेंबर 2015 रोजी रितिका सजदेहसोबत विवाह बंधनात अडकला. रोहीत सर्वप्रथ रितिकाशी 2008 मध्ये ओळख झाली होती. रितिका ही क्रिकेट क्षेत्रातील एक प्रसिद्ध मॅनेजर आहे आणि तिने रोहितच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोहीत आणि रितीकाने 2018 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. समायरा असं या रोहीत-रितिकाच्या पहिल्या मुलीचे नाव आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना अहान नावाचा मुलगा झाला. रोहित आणि रितिकाने आपल्या कुटुंबाला खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु समायरा अनेकदा तिच्या मम्मीसोबत क्रिकेट स्टेडियम दिसून येते.
2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित आणि त्याचे कुटुंब दुबईत एकत्र आले होते. समायरा आणि अहानचे फोटो पाहायला मिळाले होते. एका व्हिडिओमध्ये समायरा रोहितच्या पदकाला गळ्यात घालताना दिसली होती. रितिकानेही या क्षणांचे फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला.
नुकताच 2024 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात समायराचा डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी क्रिकेट चाहत्यांनी तिच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला होता. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी समायरा आणि रितिकाने रोहितला पाठिंबा देण्यासाठी दुबईत कुटुंबासोबत वेळ घालवला. रोहितने आपल्या इन्स्टाग्रामवर "F.A.M.I.L.Y - द वन व्हेअर वी आर फोर" असे कॅप्शन असलेला फोटो शेअर केला होता, त्यामुळे रोहीतच्या कुटुंबातील नात्यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
रोहित शर्माचे क्रिकेटमधील यश आणि कुटुंबाचा सहभाग
रोहित शर्माने 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिले. या खास कामगिरीनंतर रोहीत शर्मा एमएस धोनीनंतर दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. या विजयात त्याच्या कुटुंबाने त्याला प्रोत्साहन दिले, विशेषतः समायरा आणि रितिकाने त्याला भावनिक आधार दिला. या स्पर्धेदरम्यान रोहितने बांगलादेशविरुद्ध सामन्यात 11,000 वनडे धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी त्याने 261 इनिंगमध्ये हा टप्पा गाठला आहे, जो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे.
रोहीतच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहे. या वर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये तो फलंदाज म्हणून खेळत आहे. त्याच्या कुटुंबाने त्याला या प्रवासात साथ दिली आहे. आयपीएल सामन्यासाठी ही समायरा अनेकदा स्टेडियममध्ये त्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहते. रितिकानेही रोहितच्या करिअरमध्ये मॅनेजर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक जीवन खास आहे.












Click it and Unblock the Notifications