वैभव सुर्यवंशीची वादळी खेळी, धोनी अन् सॅमसनची जाहिरात खरी ठरेल का?, धोनीची निवृ्ती अन् त्याची ट्रॉफी
IPOL 2025, Vaibhav Suryavanshi News : देशभरात सद्या आयपीएलचीच चर्चा सुरू आहे. इंडियन प्रीमियर लीग असे पूर्ण नाव असलेल्या या खेळाला आता इंडियन पॉसिबल लीग असेही म्हटले जात आहे. त्याचे कारण म्हणजे इथे काहीही अशक्य नाही, कोणत्या क्षणी काय होईल, याची गॅरंटी नाही. कधी आणि कोणता चमत्कार घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. दरम्यान, आयपीएलच्या गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्यात देखील अगदी तसेच घडले आहे.
अवघ्या 14 वर्षांचा मुलगा आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना धो..धो धुत होता. ज्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही, ते सत्य प्रत्यक्षात काल पाहायला मिळाले.
त्याने अवघ्या 35 बॉलमध्ये शतक ठोकून नवा विक्रम स्वत:च्या नावावर करून दाखवला. 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केले. ही खेळी करून त्याने टीम इंडियासाठी स्वत:ची दारे खुली केल्याची चर्चा देखील होऊ लागली आहे.

वैभवचे विरोधी संघानेही केले कौतुक
बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेला वैभवने गोलंदाजांना अडचणीत आणले. त्याच्या धमाकेदार शतकाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या खेळापुढे विरोधी संघाचे खेळाडूही नतमस्तक झाले.
खरे सांगायचे तर, वैभव हा छोटासा आणि मोठा धमाका करणारा खेळाडू ठरला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने गुजरातला ज्या पद्धतीने जोरदार झुंज दिली त्यामुळे राजस्थानच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीमुळे वाटू लागले आहे की, आयपीएलच्या धोनी-सॅमसनच्या जाहिरातीत केलेली भाकिते खरी ठरतात की काय.
नेमकी काय आहे जाहिरात, वाचा जशीच्या तशी!
जियो हॉट स्टार वर धोनी-संजू सॅमसन यांच्या दोघांची एक जाहिरात चांगलीच पसंद आलेली आहे. त्यात धोनी आणि सॅमसन यांच्यातील संवाद खूप सुंदर आहे. तो वैभव सुर्यवंशीच्या वर झालेला आहे. हिंदीतील त्यांचे संभाषण जशाच्या तसे वाचा. धोनी कहते हैं- संजू, सुना है कि 13 साल के बच्चे खिला रहे हो? इसके बाद संजू कहते हैं- जी भैया. फिर धोनी कहते हैं- उसके पैदा होने से पहले हमने आईपीएल जीत लिया था. इस पर संजू तपाक से कहते हैं कि कोई बात नहीं भैया, आपके आईपीएल के जाने से पहले वो भी एक जीत लेगा. तब धोनी कहते हैं- टीम मेट तेरा, ऐटिट्यूड मेरा.
जाहीरातीमधील भाकित खरचं ठरले का?
जाहिरातीत जे काही सांगितले होते, ते आता खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थानला विजयापर्यंत नेऊ शकेल असे दिसत आहे. काल गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिला विजय नोंदवला आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अबाधित आहेत. दुसरीकडे, एमएस धोनीच्या संघाची अवस्था वाईट आहे. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. याचा अर्थ असा की यावेळी धोनीच्या संघाची आयपीएल जिंकण्याची शक्यता जवळजवळ नसल्यासारखीच आहे. धोनी आता निवृत्त होऊ शकतो, अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
गुजरात विरुद्धच्या सामन्यात वैभवने काय केले?
वैभवच्या खेळीमुळे राजस्थानला सामन्यात जिवंत ठेवण्यात यश आले आहे. गुजरातने राजस्थानला मोठी धावसंख्या दिली होती. सर्वांच्या नजरा यशस्वी जैस्वाल यांच्याकडे लागल्या होत्या. पण वैभव सूर्यवंशी येताच त्याने कॅमेऱ्याच्या नजरा त्याच्याकडे आणल्या. जलद सुरुवात देऊन, गुजरातला सामन्यात खूप मागे टाकले गेले. वैभवने फक्त 38 चेंडूत 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. यामध्ये त्याने 11 षटकार मारले. हा स्वतःच एक मोठा विक्रम आहे. त्याने संजू सॅमसनचा 10 षटकारांचा विक्रम मोडला. आणखी एक रेकॉर्ड आहे. हो, धोनी या आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे, तर वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण खेळाडू आहे. षटकारांच्या बाबतीत, वैभवने धोनीलाही मागे टाकले आहे.












Click it and Unblock the Notifications