Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

GT vs PBKS : IPL मध्ये पंजाब किंग्जच्या शानदार विजयाचे हे 4 हिरो! गुजरातला घरच्या मैदानावर केले गार!

IPL 2025 GT Vs Pbks Who won yesterdays match : पंजाब किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात झालेला रोमांचक सामना पंजाबने 11 धावांनी जिंकला. या सामन्यात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने गुजरातचा पार धुव्वा उडवला आणि घरच्या मैदानावत चित केले. गुजरातच्या गोलंदाजावर तुटून पडलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी हा विजय साकारला.

उच्च धावसंख्येच्या या सामन्यात पंजाब किंग्जचे वर्चस्व दिसून आले. पंजाबने घरच्या मैदानावर गुजरातचा पराभव केला आहे. पंजाबच्या या विजयात अनेक हिरो होते पण गुजरातकडून सामना पूर्णपणे हिसकावून घेणारे चार खेळाडू होते.

IPL 2025 GT Vs Pbks

हे आहेत ते चार खेळाडू

1. श्रेयस अय्यरने नाबाद 97 धावा केल्या (GT vs PBKS, IPL 2025)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पासून मजबूत फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरने देखील IPL ला धमाकेदार सुरुवात केली. पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 42 चेंडूंत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. श्रेयस अय्यरच्या या खेळीमुळे पंजाबने गुजरातसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पंजाबने गुजरातकडून ही मॅच हिसकावून घेतली.

हेही वाचा : GT vs PBKS: गुजरात विरुध्द पंजाब यांच्यात कोणी किती सामने जिंकले, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

2. प्रियांश आर्यने दाखवली ताकद

प्रियांश आर्यने गुजरात टायटन्सविरुद्ध आपली ताकद दाखवली. 204 च्या स्ट्राईक रेटने, प्रियांश आर्यने 23 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 47 धावा केल्या. प्रियांश आर्यने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. मात्र, त्याचे अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकले आणि रशीद खानच्या एका शानदार चेंडूवर तो बाद झाला. पण प्रियांश आर्य आयपीएलमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला.

3. शशांक सिंगने दाखवला जलवा

शशांक सिंगने 16 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. त्याने 20व्या षटकात 19व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक कायम ठेवला आणि शेवटच्या षटकात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. अय्यरने 42 चेंडूंचा सामना करत नऊ षटकार आणि पाच चौकारांसह 97 धावा केल्या. शशांकमुळे तो शतक झळकावण्यास मुकला पण अधिक धावा झाल्यामुळे संघाने सामना जिंकला.

4. अर्शदीप सिंगने चमत्कार केला

पंजाब किंग्जच्या विजयाचा हिरोही अर्शदीप सिंग ठरला. अर्शदीप सिंगने 4 षटकात 36 धावा देत 2 बळी घेतले. यासह त्याने शेवटच्या षटकात राहुल तेवतियाला धावबाद करून पंजाबला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : सर्व धुरंधर फेल! अंतीम षटकात सिक्सर ठोकून साकारला विजय, दिल्लीसाठी वनमॅन आर्मी बनला आशुतोष शर्मा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+