Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

GT vs PBKS: गुजरात विरुध्द पंजाब यांच्यात कोणी किती सामने जिंकले, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2025, GT vs PBKS : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 5वा सामना 25 मार्च रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. चालू सीझनमध्ये दोन्ही संघ सुरुवातीच्या सामन्यात एकमेकांसमोर येतील. गुजरात टायटन्स संघाची युवा खेळाडू शुभमन गिलकडे असेल तर पंजाब किंग्ज संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे असणार आहे.

गुजरात टायटन्स संघाने 2022 मध्ये एकदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असले तरी पंजाब किंग्जचा जेतेपदाचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये सामना अटीतटीचा दिसून येत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमधील झालेल्या रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

GT vs PBKS head to head records

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्ज (PBKS) एकूण पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर वर्चस्व राहिलं आहे. गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्ध तीन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते, त्यानंतर 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून विजय मिळवला. त्याच वेळी 37 व्या सामन्यात पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघ येथे एकदा आमनेसामने आले होते. गेल्या सीझनमध्ये 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने चमकदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 3 गडी राखून पराभूत केले. त्यादरम्यान पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 199 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 19.5 षटकांत 7 गडी गमावून 200 धावा करून लक्ष्य गाठलं होते आणि सामना जिंकला होता.

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, कोण मारणार बाजी?

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या स्टेडियमची खेळपट्टी आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्येसाठी ओळखली जाते. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही संतुलित पृष्ठभाग प्रदान करते. आउटफिल्ड वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेपर्यंत सहज पोहोचतो. दरम्यान फिरकीपटूंना संघर्ष करावा लागू शकतो.

गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, राहुल तेवतिया, रशीद खान, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, गेराल्ड कोएत्झी, अर्शद खान, गुरनूर ब्रार, शेरफेन रदरफोर्ड, साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनत, कुलवंत खेजरोलिया.

पंजाब किंग्ज - श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, विजयकुमार विशाख, यश ठाकूर, मार्को जॉन्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर सिंग, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, पैला अविनाश, प्रवीण दुबे, नेहल वधेरा, विष्णू विनोद.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+