सर्व धुरंधर फेल! अंतीम षटकात सिक्सर ठोकून साकारला विजय, दिल्लीसाठी वनमॅन आर्मी बनला आशुतोष शर्मा!
Ipl 2025 dc vs lsg Who won yesterday's match : आयपीएलच्या चौथ्या मॅचमध्ये धमाल झाली. दिल्ली आणि लखनऊ सूपर जायंट्स या संघात झालेला सामना अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झाला. हा सामना लखनऊ जिंकेल असे वाटत असतानाच दिल्लीसाठी संकटमोचक म्हणून आशुतोष शर्मा धावून आला आणि त्याने दिल्लीला न भुतो न भविष्यती विजय मिळवून दिला. या सामन्याचा खरा हिरो आशुतोष शर्मा ठरला.
दिल्लीचा विजय साकार करण्यासाठी एकीकडे सर्व दिग्गज अपयशी ठरले परंतु तरीही संघाला विजयाकडे नेणारा आशुतोष शर्मा डीसीसाठी वन मॅन आर्मी बनला आहे. या सामन्यात आशुतोष शर्मा विजयाचा हिरो ठरला. आशुतोष शर्माने शेवटच्या षटकात षटकार ठोकत अशक्यप्राय लक्ष्य गाठून दिल्लीला विजय मिळवून
दिला.

दिल्लीने 66 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या
दिल्लीने 66 धावांवर दिल्लीने 6 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर आशुतोष शर्मा आणि विपराज निगमने सामना बदलला. आशुतोष शर्मा सामन्याचा हिरो ठरला तो कसा तर.. दिल्ली संघाने 3 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी आघाडी घेत वेगवान फलंदाजीला सुरुवात केली. दिल्लीला विजयासाठी 46 चेंडूत 97 धावांची गरज होती. पण यादरम्यान ट्रिस्टन स्टब्स आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर विपराज निगमने येऊन शानदार फलंदाजी करत लखनऊवर पूर्ण दडपण आणले.
आशुतोष शर्माची अर्धशतकी खेळी
आशुतोष शर्माच्या अर्धशतकी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला विजय साकार करता आला.नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊने निकोलस पूरन आणि मिचेल मार्शच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 209 धावा केल्या. एकेकाळी हे लक्ष्य गाठणे दिल्लीला अशक्य वाटत होते, पण संघाने इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले.
DC vs LSG IPL 2025: आशुतोष शर्माने लखनऊला हरवले
दरम्यान, मॅचमध्ये दिल्लीने जोरदार जोरदार पुनरागमन केले. हा सामना जोरदार झाला आयपीएलमध्ये अशाच सामन्याची अपेक्षा क्रीडा रसिकांना असते. शतकी खेळी जरी कुणी दिल्लीतर्फे केली नसेल पण हा आशुतोष आणि विपराज निगमच्या खेळीचा विजय होता.
डीसी विरुद्ध एलएसजी दिल्ली कॅपिटल्स: जॅक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डुप्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (क), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार. प्रभावशाली खेळाडू : करुण नायर, आशुतोष शर्मा, डोनोवन फरेरा, त्रिपुराना विजय, दर्शन नळकांडे.
लखनऊ सुपर जायंट्स: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, शरद्वीश अहमद, दिग्विश अहमद, दिग्गज राव, रवीश यादव. प्रभावशाली खेळाडू: एम सिद्धार्थ, अब्दुल समद, हिम्मत सिंग, आकाश सिंग, राजवर्धन हंगरगेकर.












Click it and Unblock the Notifications