Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : राहूलवर सुदर्शनचे शतक भारी! गिलसोबत रचला आयपीएलमध्ये 'हा' विक्रम! गुजरातचा ऐतिहासिक विजय

IPL 2025 DC VS GT : आयपीलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर गुजरात जायंट्स संघाने ऐतिहासिक विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये मुख्य भूमिका साई सुदर्शन आणि शुभमन गिल या जोडीने पार पाडली. एकत्रितपणे धमाकेदार कामगिरी करत दिल्ली संघाला या खेळाडूंनी धुळ चारली.

आयपीएलच्या या हंगामात गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास साईच्या शतकाने मोठी झाली. गुजरातने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आणि एक मोठा विक्रमही केला. गुजरातने आपला सर्वात मोठा विजय नोंदवला.

IPL 2025 DC VS GT

गुजरात संघाने हा विक्रम केला?

200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने 19 षटकांत एकही विकेट न गमावता 205 धावा केल्या. गुजरातने 10 विकेटने विजय मिळवण्यासाठी केलेली 205 धावांची भागीदारी देखील आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी आहे. गुजरातने दुसऱ्यांदा सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम रचला. या हंगामाच्या सुरुवातीला, गुजरातने अहमदाबादमध्ये दिल्लीविरुद्ध 204 धावांचा पाठलाग केला होता आणि आता पुन्हा एकदा दिल्लीविरुद्ध 205 धावांचे लक्ष्य गाठले आहे.

गिल आणि साई सुदर्शनचा मोठा विक्रम

गिल आणि सुदर्शन हे आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणारी भारतीय जोडी बनली आहे. या दोघांनीही गुजरातसाठी या हंगामात आतापर्यंत 839 धावा केल्या आहेत. यापूर्वी, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 744 धावा केल्या होत्या. हा विक्रम या संघांनी मोडीत काढला.

के.एल. राहुलच्या शतकाला सुदर्शनचे शतक ठरले भारी

कालच्या सामन्यात के.एल राहुलने धमाकेदार शतक साजरे केले. आयपीएल सीजनमधील हे त्याचे पाचवे शतक ठरले. त्याने 60 चेंडूत 100 धावा करत हे शतक त्याने साजरे केले. त्याने आपल्या खेळात 14 चौकार आणि 4 षटकार लगावत 65 चेंडूत 112 धावा केल्या.

के. एल. राहुलची ही धुंवाधार खेळीवर सुदर्शन पुढच्याच इनिंगमध्ये भारी ठरला. कारण त्याने गुजरातकडून खेळताना 61 चेंडूतच 108 धावा केल्या त्यामुळे राहुलची खेळी या सामन्यात व्यर्थ गेली. सुदर्शनला शुभमन गिलची साथ मिळाली. गिलने 53 चेंडूत 93 धावा केल्या. आता ही जोडी आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारी ठरली आहे.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलचा रणसंग्राम आजपासून पुन्हा सुरु! RCB vs KKR मॅच कधी आणि कुठे पाहाल, कोण वरचढ? वाचा

हेही वाचा : IPL 2025 : 'या' दिवशी सुरु होणार आयपीएल, अंतिम सामना कुठे खेळला जाईल?, महत्त्वाचे अपडेट आले समोर!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+