IPL 2025 : आयपीएलचा रणसंग्राम आजपासून पुन्हा सुरु! RCB vs KKR मॅच कधी आणि कुठे पाहाल, कोण वरचढ? वाचा
IPL 2025 RCB vs KKR Match Date and Time : आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि बंगळुरुचा सामना होत आहे. सिंदूर ऑपरेशननंतर भारतात सुरु असलेले आयपीएल सामने थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज 17 मे 2025 पासून पुन्हा हे सामने सुरु होत आहे. आयपीएल सुरु झाल्यानंतर आता पहिला सामना कोलकाता नाईट रायडर आणि राॅयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवत ऑपरेशन सिंदूर राबवले. यादरम्यान पाकिस्तानने हल्ले केले याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानातील महत्वाच्या शहरावर हल्ले करुन पाकच्या लष्करी सामर्थ्यांचे त्यांचे अतोनात नुकसान केले. धरमशाला येथे आयपीएल सामना सुरु असताना पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरु होते, सुरक्षेच्या कारणांमुळे धरमशाला येथील सामना थांबवण्यात आला व आयपीएल स्थगित करण्यात आले होते, ते आजपासून पुन्हा सुरु झाले आहे.

आज शनीवारी आयपीएलमध्ये चिन्नास्वामी स्टेडीयमवर कोलकाता आणि बंगळुरुचा सामना रंगणार आहे. विराट कोहलीचा संघ विजयी घौडदौडीसाठी सज्ज आहे. विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषणनेनंतर त्याचा हा पहिलाच टी-20 मॅच आहे. हा सामना कोठे पाहता येईल आणि कोणता संघ वरचढ आहे हेड टू हेड जाणून घेऊया.
कधी आणि कोठे पाहता येणार RCB vs KKR सामना
आरसीबी विरुद्ध केकेआर सामना कधी आहे?
राॅयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यातील सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता आहे.
आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याचा टॉस कधी होईल?
आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याचा लाईव्ह टॉस 17 मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता होईल.
RCB VS KKR आयपीएल 2025 सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल?
RCB VS KKR हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (स्टार स्पोर्ट्स 1 एचडी/एसडी) वर इंग्रजी समालोचनासह थेट प्रक्षेपित केला जाईल.
आजच्या आरसीबी विरुद्ध केकेआर आयपीएल 2025 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात कसे पहावे?
RCB VS KKR सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ-हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
कोलकाता विरुद्ध बंगळुरू हेड टू हेड
- आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर आणि राॅयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात ३५ सामने झाले आहेत. यातील कोलकाताने 20 तर बंगळुरुने 15 सामने जिंकले आहेत.
- एका अर्थाने आयपीएलमध्ये कोलकाता बंगळुरुवर भारी आहे.
- आता चिन्नास्वामी स्टेडीयमवर कोलकाताचा रेकाॅर्ड जर पाहायचा झाल्यास तो दमदार असल्याचे दिसते. येथे कोलकाताने खेळलेल्या 12 सामन्यात 8 वेळा कोलकाता संघाने बाजी मारली आहे.
- याच स्टेडीयमवर कोलकाताने बंगळुरुविरोधत 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.












Click it and Unblock the Notifications